Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका


Onion Export Ban |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वोत बँकवर महागाईचा फटका बसू नये म्हणून स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी लादलेली कांदा निर्यात बंदी ही ३१ मार्च नंतरही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले आहेत.

सरकारने यंदा वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरणांचा अवलंब केला आहे. आधी निर्यात शुल्कावरील कर वाढवला आणि नंतर थेट निर्यात बंदी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, निदान ३१ मार्चला कांदा निर्यात बंदी हटवल्यानंतर तरी किमान उन्हाळ कांद्याला भाव मिळतील. मात्र, कांदा उत्पादकांच्या या आशेवरही सरकारने पाणी फेरले आहे. (Onion Export Ban)

Onion Export Ban | सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार; कांदा निर्यात बंदी कायम राहणार

यातच आता शेती केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून ५ लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार असून, यामुळे पुन्हा कांद्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. येत्या दोन तीन दिवसात सरकार कांद्याच्या खरेदीला सुरुवात करणार आहे. तर, यानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून ५ लाख मेट्रीक टन रब्बी कांदा खरेदी करणार असून, सध्या कांदा निर्यातबंदीमुळं आधीच कांद्याचे दर खाली आले आहेत आणि हिच संधी साधत केंद्र सरकार आता कमी दरात कांद्याची खरेदी करणार आहे. मात्र, याचा कांदा उत्पादकांना पुन्हा एकदा आर्थिक फटका बसणार आहे. दरम्यान सध्या स्थानिक बाजारात कांद्याला ८०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत असून, काही ठिकाणी तर यापेक्षाही कमी दर आहे.

Onion Export Ban | याचा शेतकऱ्यांना का तोटा..?

कांदा निर्यात बंदीआधी तब्बल ४ हजारांवर असलेले कांद्याचे बाजारभाव हे त्यानंतर दिवसेंदिवस खालावत गेले. तर, सध्या कांद्याला मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा खर्चही निघत नाही. यंदा कांद्याचे उत्पादन कमी असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तरीही गरज पूर्ण होऊनही उरेल. इतक्या कांद्याचे उत्पादन आहे. मात्र, तरीही निर्यातबंदीमुळे देशातला कांदा देशातच असल्यामुळे भाव सतत खाली पडत आहेत. (Onion Export Ban)

Onion Export Ban | गुजरातचा कांदा सुरु झाला की कांदा निर्यातबंदी उठवणार…

अशातच केंद्र सरकार आता शेतकऱ्यांकडून ५ लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार असून, याचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. कारण सध्या कांद्याचे भाव कमी असून, या खालवलेल्या भावात केंद्र सरकार कांदा खरेदी करणार आणि आता खरेदी केलेल्या या कांद्याचा सरकार स्टॉक करणार आहे. ज्यावेळी बाजारात कांद्याचे दर वाढतील, त्यावेळी सरकार हा स्टॉक केलेला कांदा सरकार बाजारात आणेल. त्यावेळी जर हा कांदा बाजारात आला. तर, आपोआपच कांद्याचे भाव पुन्हा गडगडतील. तसेच स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्याचा परिणाम नक्कीच कांद्याच्या भावांवर होईल.