Onion Export Ban | सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार; कांदा निर्यात बंदी कायम राहणार


Onion Export Ban | ७ डिसेंबर २023 रोजी केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी लागू केली होती. तर, ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ रोजी हटवली जाणार असल्याचे अध्यदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आता कांद्यावरील निर्यात हटवली जाईल आणि कांद्याचे भाव वाढतील, अशी आशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, पुन्हा एकदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा हिरमोड केला असून, आता कांद्यावरील निर्यात बंदी ३१ मार्चनंतरही कायम असणार आहे. आधीच निर्यात बंदीमुळे आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाविरोधात रोष आहे. त्यात आता कांदा निर्यात बंदी कायम ठेऊन सरकारने शेतकऱ्यांचा नाराजी आणखी ओढावून घेतल्याचे दिसत आहे. (Onion Export Ban)

Onion Export Ban | गुजरातचा कांदा सुरु झाला की कांदा निर्यातबंदी उठवणार…

पुढील सुचनेपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर स्थानिक बाजारात नियंत्रणात रहावे. यासाठी कांद्याचे भाव वाढू नये आणि याचा भाजपप्रणित सरकारच्या मतांवर महागाईचा फटका बसू नये. म्हणून केंद्र सरकारने ३१ मार्च नंतरही कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या परकीय व्यापार विभागाचे महासंचालकांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी संतोष कुमार सारंगी यांनी काल याबाबत एक ‘नोटीफिकेशन’ काढली असून, यात ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या हंगामात ऐन मोसमात कांदा निर्यात बंदी लागू केल्याने लाल कांद्याचे ४ हजारांवर असलेले भाव खाली आपटले.

Onion Export Ban | अधिसूचनेत काय..?

त्यामुळे शेतकऱ्यांना लाल कांद्यातून इच्छित उत्पादन घेता आले नाही. आता निदान उन्हाळ कांद्याला तरी चांगले भाव मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या परकीय व्यापार विभागाचे महासंचालकांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी याबाबतचे अधिकृत नोटीफिकेशन प्रसिद्ध केले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, “७ डिसेंबर २023 रोजी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केली होती. ती ३१ मार्च २०२४ पर्यंत कायम राहणार होती. मात्र आता नव्या निर्यात बंदी धोरणानुसार पुढील सूचना येईपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम ठेवण्यात आली आहे”.

Onion Export Ban | सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल..?; नेमकं प्रकरण काय

कांदा निर्यातीबाबतच्या केंद्र सरकारच्या या धरसोडीच्या आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गमावण्याची वेळ आली आहे. तर, देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परवडत नसतानाही कांदा विकण्याची वेळ आली आहे. सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याला सरासरी १३०० रुपयांचा भाव मिळत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आयहे. मात्र, यामुळे दुसरीकडे पुन्हा एकदा सरकारने शेतकऱ्यांना नाराज केले आहे. दरम्यान, याचा मोठा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Onion Export Ban)