Heat Wave | नाशिककर सावधान..!; या तालुक्यांत उष्मघाताची लाट


Heat Wave |  सध्याचे वर्ष हे उष्ण वर्ष असून, आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक ठिकाणी उष्णता अनेकपटींनी वाढली आहे. दरम्यान, अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवातही झाली नसून, मार्च महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील तापमान हे तब्बल 33 ते 35 अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत आतापासूनच प्रचंड उष्णता जाणवत आहे. यंदा जिल्ह्यातील मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट असल्याने या भागात उष्माघाताची लाट येण्याची शक्यता आहे. (Heat Wave)

उन्हाचा पार हा दिवसेंदिवस वाढत असल्याने उष्माघात होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील आरोग्य केंद्रांत ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे, उष्माघाताशी संबंधित काही लक्षणे असल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

El-Nino | 2024 मध्ये देशात दुष्काळ? काय आहे नेमकं कारण?

Heat Wave | उष्माघात का आणि कसा होतो..?

सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून, त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन केले जात आहेत. ऊन वाढत असल्याने नागरिकांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू शकतात. उन्हात मजुरीचे काम करणे, तसेच भर उन्हात शारीरिक श्रमाची कामे करणे, जास्त तापमानात काम करणे, घट्ट कपडे वापरणे, तसेच उष्णतेशी सतत संबंध आल्याने उष्माघात होऊ शकतो. ताप, शरीर शुष्क होऊ लागणे, सतत डोके दुखी, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे, भूक न लागणे, घाम येणे, थकवा जाणवणे, त्वचा कोरडी होणे, उलटी, मानसिक अस्वस्थता जाणवणे, सतत तहान लागणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. (Heat Wave)

काशी घ्याल काळजी

दरम्यान, उष्माघातापासून दूर राहण्यासाठी वाढत्या तापमानाच्या वेळेत जास्त कष्टाची कामे करू नये, कष्टाची कामे ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावी, तसेच काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालू नये, सैल व शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे, पाणी आणि सरबत भरपूर प्या, उन्हात जाण्याआधी पोटभर जेवण करा, डोक्याला पांढरा रुमाल बांधा. दुचकीवर गॉगल्स किंवा हेल्मेट वापरावे. 
Nashik News | पाच तालुक्यांत ‘कृषी भवन’; मंत्री भूसेंच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना दिलासा

जिल्ह्यातील ११२ आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू

दरम्यान, जिल्ह्यातील काही तालुक्यांत उष्मघाताच्या लाटेची शक्यता वर्तविली असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात ११२ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष सुरू केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिलेली आहे. (Heat Wave)