Onion Export Ban | गुजरातचा कांदा सुरु झाला की कांदा निर्यातबंदी उठवणार…


Onion Export Ban | गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची ‘भारत जोडओ न्याय्य यात्रा’ ही नाशिकमध्ये आली होती. यावेळी चांदवड येथे त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. यानंतर शरद पवार हेदेखील नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनीही निफाडमध्ये शेतकऱ्यांची जाहीर सभा घेतली होती. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनीदेखील कांदा उत्पादकांची व्यथा मांडली असून, गुजरातचा कांदा सुरु झाला की कांदा निर्यातबंदी उठवली जाईल, या शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टिका केली आहे.

आज शेतकरी हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आपल्याकडील शेतकऱ्यांकडे जोपर्यंत कांदा होता. त्यावेळी त्या कांद्याला बऱ्यापैकी बाजार भावही मिळत होता. मात्र, असे असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. ही निर्यातबंदी मार्च अखेरपर्यंत असणार आहे. कारण आता गुजरातचा कांदा सुरु होताच कांद्यावरील निर्यातबंदी ही उठवली जाणार असल्याचे आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.(Onion Export Ban)

Onion Export Ban | सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल..?; नेमकं प्रकरण काय

Onion Export Ban | भाजपला सत्तेपासून दूर करायचे आहे

काल उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. त्यावेळी बाजार समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणूकीत आपल्याला एका महाशक्तीशी लढायचे असून, या निवडणूकीत आपल्याला भाजपला सत्तेपासून दूर ठेवयाचे आहे.

त्यामुळे धुळे लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल, त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन रोहित पवारांनी यावेळी केले. अनेक वेळा मतदार संघात आपली ताकद असूनही मित्र पक्षाला संधी द्यावी लागते. कारण आपल्याला मुख्यतः भाजपला सत्तेपासून दूर करायचे आहे. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि मविआचा उमेदवार हा पुर्ण ताकदीने उतरणार आहे.

Onion Export Ban Lift | सरकार शेतकऱ्यांसमोर नमले..! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली.

आता महाराष्ट्राचा नंबर कोठेच लागत नाही

पुढील एक किंवा दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवरुन धुळे लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टिका केली. २०१४ पर्यंत महाराष्ट्र हा संपूर्ण देशात एक नंबरवर होता. पण आता महाराष्ट्राचा नंबर कोठेही लागत नाही. या महायुती सरकारच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प आणि उद्योगधंदे हे गुजरातला गेलेत.

प्रत्येक वर्षी गुजरातला तब्बल २६ लाख कोटींचे करार केले जातात. तर महाराष्ट्रात केवळ एक ते दोन लाख कोटींचेच करार होतात. ज्यावेळी भाजप ही महाराष्ट्रात सत्तेवर आली आहे. त्यावेळी राज्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा भाजप सरकारने केला आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, पीक विमा, स्पर्धा परिक्षा पेपर फुटी या प्रकरणांवरूनही आमदार रोहित पवार यांनी भाजपप सरकारवर शाब्दिक आसूड ओढले. (Onion Export Ban)