Onion Price | हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार हालाकीचे ठरले. ऐन लागवडीच्या वेळी पावसाची हुलकावणी, नंतर काढणीच्यावेळी अवकाळीचा तडाखा, आणि पीक बाजारात येणार तोच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांना यावली रडवलेच. दरम्यान, आता उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाला आहे. मात्र, या परिस्थितीमुळे कांद्याच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. आजमितीस काही ठिकाणी कांद्याला प्रतिकिलो १ रुपते तर, कुठे १५ ते ३० आणि ३५ रुपयही दर मिळत आहे. (Onion Price)
ज्या बाजारपेठेत कांद्याची जास्त आवक झाली तेथे कांद्याला कमी दर मिळतोय आणि जेथे कांद्याची आवक कमी झाली त्या बाजारपेठेत कांद्याचे दर जास्त आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात महागाई वाढू नये म्हणून सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असून, यासाठी केंद्र सरकारकडून आयात निर्यात धोरणात सतत बदल केले जात आहे.
Onion Price | निर्यात बंदी हटवल्यानंतरही कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारची योजना..?
यामुळेच कांद्याचे वाढते दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने कांदा निर्यात बंदी लादली आणि देशातील स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर झपाट्याने घसरले. आता ३१ मार्च रोजी कांद्यावरील निर्यात बंदी हटणार आहे. पण आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले तरी त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
Onion Price | कोठे कसे आहेत कांद्याचे दर..?
दरम्यान, राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांत कांद्याला कसा दर मिळतोय ते पाहुयात… येवला बाजार समितीत कांद्याला प्रति किलो ३ ते १५ रुपये दर मिळाला. तर, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने तिथे कांद्याला किमान १ रुपया ते ११ रुपये असा दर मिळाला. पुणे बाजार समितीत कांद्याला प्रति किलो ६ ते १२ रुपयांचा दर मिळात असून, पारनेर बाजार समितीत कांद्याला ३ ते १७ रुपये असा दर मिळत आहे. नागपुर बाजार समितीत कमी आवक झाल्याने तिथे कांद्याला प्रति किलो २५ रुपये किलो असा दर मिळाला आहे. कोल्हापुरात ३५ रुपये किलो दर मिळाला. (Onion Price)
Onion Export | आणखी तीन देशांमध्ये होणार कांद्याची निर्यात; यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा..?
कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार काय करणार ?
८ डिसेंबर रोजी लादलेली कांदा निर्यात बंदी ही आता ३१ मार्च रोजी हटवली जाणार आहे. त्यामुळे ३१ मार्चनंतर पुन्हा कांद्याचे दर वाढू शकतात. दरम्यान, कांद्याचे दर वाढू नयेत नियंत्रित राहावे. यासाठी सरकारने योजना आखली असून, केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक तयार करणार आहे. भविष्यासाठी कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे नियोजन सुरू आहे.