Onion Price | निर्यात बंदी हटवल्यानंतरही कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारची योजना..?


Onion Price | यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कांद्याचे उत्पादनही कमी होते. त्यामुळे सुरुवातीला कांद्याचे दर हे वरचढ हीते. मात्र, स्थानिक बाजारांत कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी लादली. दरम्यान, आता निर्यात बंदीचे निर्बंध हे शिथिल करण्यात येत असून, काही देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी देखील देण्यात आली आहे. तर, ३१ मार्च रोजी कांद्यावरील निर्यात बंदी ही उठवण्यात येणार असून, यानंतर देखील कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून सरकारन काही तयारी केली आहे.(Onion Price)

Onion Price | सरकारची योजना..?

दरम्यान, आता ३१ मार्चनंतर कांदा निर्यातबंदी हटवण्यात येणार असून, त्यामुळे आता कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, यानंतर दर वाढू नये यासाठी सरकारने विशेष योजना तयार केली आहे. यंदा कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, त्यामुळे दर वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार कांद्याचा बफर स्टॉक तयार करणार आहे. आता कांद्याचे भाव नियंत्रणात असले तरीही येणाऱ्या काळात केंद्र सरकारने आतापासूनच भावांचे नियोजन सुरू केले आहे.

Onion Export | आणखी तीन देशांमध्ये होणार कांद्याची निर्यात; यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा..?

५ लाख टन कांद्याची खरेदी

यावर्षी केंद्र सरकार पाच लाख टन इतका कांदा बफर स्टॉकसाठी खरेदी करणार असयाची माहिती आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) या एजन्सी सरकारतर्फे कांद्याची खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Onion Price)

बफर स्टॉकमधून कांदा विक्री ?

दरम्यान, केंद्र सरकार बफर स्टॉकमधून देशात सवलतीच्या दरात कांद्याची विक्री करणार असून, सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. कांड निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत कायम असून, यावर्षी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याच्या अंदाजानुसार सरकारने बफर स्टॉक तयार करण्याची योजना आखली आहे.

Onion News | सरकारमुळे कांदा उत्पादक देशोधडीला लागले; कांदा रथ देवळ्यात दाखल

२०२३-२४ मध्ये कांद्याचे उत्पादन घटले

दरम्यान, कृषी मंत्रालयाच्या निवेदनानुसार, यावर्षी २५४,७३ लाख टन इतके कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे. तर, मागील वर्षी कांदा उत्पादन हे ३०२.०८ लाख टन इतके होते. महाराष्ट्रात ३४.३१ लाख टन, कर्नाटकमध्ये ९.९५ लाख टन, आंध्र प्रदेशमध्ये ३.५४ लाख टन व राजस्थानमध्ये ३.१२ लाख टन उत्पादन कमी झाले असून, देशातील एकूण कांड उत्पादनात घट होणार आहे.