Krushi Bhavan | आता नाशिकच्या शेतकऱ्यांना कृषि विषयक कामांसाठी फिरण्याची गरज नाही


Krushi Bhavan | आता नाशिकच्या शेतकऱ्यांना शेतीविषयक सरकारी कामांसाठी जास्त फिरण्याची गरज नाही. कारण आता शेतकऱ्यांची सर्व कामे ही एकाच छताखाली होणार आहे. जिल्ह्यात कृषि विभागाची अनेक कार्यालये सगळीकडे विखुरलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना एका कामासाठी अनेक कार्यालये फिरावी लागतात. मात्र, आता ही सर्व कामे एकाच छताखाली करणे शक्य झाले आहे. यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत दिंडोरी तालुक्यात कृषी भवन इमारत उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, यामुळे आता शेतकऱ्यांची कृषी विषयक कामे सोयीची होणार आहे. (Krushi Bhavan)

Nashik | नांदगावमधील बाजार समितीत शेतकऱ्यांना शिवीगाळ

दरम्यान, दिंडोरी येथे जिल्हास्तरीय तसेच, तालुका स्तरावरील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीत असणे, हे कामकाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही अत्यावश्यक होते. जिल्ह्यातील कृषि विभागाचा जनसंपर्क पाहता कृषि विभागाची विखुरलेली कार्यालये ही प्रशासकीय दृष्ट्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही फार गोंधळलेले होते. शिवाय कार्यरत असलेल्या कार्यालयांसाठी मोठया प्रमाणावर परीरक्षणासाठी निधी खर्च करावा लागत होता. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्चही वाढत जातो.

Nashik News | शेतकऱ्यांवरच रेशनचे गहू खाण्याची वेळ

कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यामुळे एकाच येथे अद्ययावत कृषि संकुल बांधणे आवश्यक असल्या कारणाने त्या दृष्टीने कृषि विभागातील, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, दिंडोरी व मंडळ कृषि अधिकारी, वणी, उमराळे व ता. दिंडोरी, जि. नाशिक या कार्यालयांसाठी कृषिभवन इमारत ही दिंडोरी बांधण्यात येणार आहे. तरी या कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.(Krushi Bhavan)