Onion Export | आणखी तीन देशांमध्ये होणार कांद्याची निर्यात; यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा..?


Onion Export |  सामान्य ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक बाजारात कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने देशात कांदा निर्यात बंदी लागू केली. यामुळे काही महिन्यांपूर्वी ४ हजारांच्या पार असलेला कांदा आता हजार रुपयांवर आल्यामुळे शेतकरी आक्रमक होते. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी उठवल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र, प्रत्यक्षात निर्यात बंदी काढण्यात आलीच नव्हती.

त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला आणि तोंडावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा रोष सरकारला परवडणारा नाही. त्यामुळे  कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली असून, बांग्लादेशनंतर आता आणखी दोन देशांमध्ये कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. अत्र, यावर देखील काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. (Onion Export)

Onion Export | बांग्लादेशला नाशिकचा लाल कांदा हवा; मात्र याचा शेतकऱ्यांना फायदा आहे..?

Onion Export | या देशांत कांद्याची होणार निर्यात 

दरम्यान, कांड निर्यात बंदी लादल्यामुळे देशात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने अखेर कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. आधी बांग्लादेश आणि आता बहारीन, मॉरिशस आणि भूतान या तीन देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने याबाबत अधिसूचना जारी केली असून, यात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तर, ही निर्यात नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या माध्यमातून केली जाणार आहे.

कोणत्या देशाला किती कांदा…?

विदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भूतानला ३,००० मेट्रिक टन कांदा निर्यात होणार आहे. तर, बहारीनला १,२०० मेट्रिक टन इतका कांदा जाणार आहे. मॉरिशसला ५५० मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली जाणार आहे. तर याआधी बांग्लादेश ५० हजार टन नाशिकच्या लाल कांद्याची निर्यात कण्यास परवानगी दिली होती. मात्र, हे प्रमाण कमी असून, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Onion Export Ban | सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल..?; नेमकं प्रकरण काय

निर्यातीवरील निर्बंध हटवले..?

सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कांद्याच्या निर्यातीवर पहिल्यांदा बंदी घातली होती. कांद्याचे भाव हे स्थानिक बाजारात खाली आणण्यासाठी केंद्र सरकारने आधी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावले. मात्र, त्यातून काही फायदा न झाल्याने सरकारने किमान निर्यात दर हा ८०० डॉलर प्रति टन इतका ठेवला होता. पण त्यानंतरही सरकारला इच्छित लाभ न मिळाल्याने ८ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. ही निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत कायम असणार आहे. दरम्यान, अजूनही कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आले नसून, केवळ मित्र राष्ट्रांनाच काही प्रमाणात कांद्याचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.(Onion Export)

शेतकऱ्यांना फायदा नाहीच

आता जरी कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. तरी याचा शेतकऱ्यांना फार काही फायदा होणार नाही. कारण शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कांदा संपलेला आहे. ज्यावेळी कांदा होता त्यावेळी भाव नव्हता आणि आता निर्यात बंदी लवकरच उठणार असून आता भाव वाढतील तर, कांदा नाही. तसेच सध्या काही देशांना निर्यात करण्याची परवानगी दिली असली तरी ती कमी प्रमाणात असून, यामुळे बाजार भावावर फार काही परिणाम होणार नसल्याचे शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.