Onion News | सरकारमुळे कांदा उत्पादक देशोधडीला लागले; कांदा रथ देवळ्यात दाखल


Onion News | केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी देशात येत्या ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी लागू केली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, निर्यात बंदिपूर्वी जो कांदा ४ हजारांच्या घरात होता. तो आता केवळ हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, नाशिक, सोलापूर, अहमदनगर यासारख्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमधील कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले असून, याठिकाणी विविध आंदोलनं केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्राने बांग्लादेशला ५० हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली असून, नाशिकचा लाल कांदा हा ११ मार्चपूर्वी बांग्लादेशमध्ये पोहोचवायचा आहे. मात्र, असे असले तरी या निर्यातीचा शेतकऱ्यांना फारसा काही फायदा होणार नसून, हा केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. (Onion News)

Onion News | अधिकारीही झाले कांदा उत्पादकांचे ‘वैरी’; शेतकऱ्यांची लूट थांबेना

Onion News | सरकार आमच्याच उरावर का बसतंय?

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा ‘कांदा रथ’ सुरू करण्यात आला असून, काल या रथाचे देवळा येथे आगमन झाले. यावेळी ‘सरकार आमच्याच उरावर का बसतंय? असे कांदा उत्पादकांचे संतप्त सवाल घेऊन व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटलेला हा कांदारथ देवळा येथे डाखाल झाला असता, येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या रथाचे जोरदार स्वागत केले. तसेच यावेळी ‘सबका साथ सबका विकास’ असे म्हणत भाजप सरकार विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

तर मग या विकासातून शेतकऱ्यांना आणि प्रामुख्याने कांदा उत्पादकांना का वगळले जात आहे. भरात हा कृषिप्रधान देश आहे मग या कृषिप्रधान देशात नेहमी शेतकरी वार्गालाच का गृहीत धरले जाते. या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक हे आज देशोधडीला लागलेले आहेत. अशा आशयाच्या कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडणारा हा ‘कांदारथ’ सध्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे.(Onion News)

Onion News | कांद्याला हमीभाव न मिळाल्यास…; शेतकऱ्यांचा इशारा

मैंने आपका प्याज और नमक खाया है

दरम्यान, देवळा तालुक्यातील विठेवाडी गावात हा कांदारथ दाखल झाला असता, यावेळी येथे कांदा उत्पादकांनी केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. तर, पंतप्रधान मोदी हे मागील निवडणुकीत नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी येथील जाहीर सभेत शेतकऱ्यांना उद्देशून म्हटले होते की, “बोलताना त्यांनी सांगितले होते की, “मैंने आपका प्याज और नमक खाया है, प्याज उत्पादक किसानों को मै उचित न्याय दुंगा”.

मात्र, आता पंतप्रधानांना त्यांच्या या व्यक्तव्याचा पूर्णपणे विसर पडला असून, कांदा उत्पादकांच्या या दूरवस्थेला केंद्र व राज्य हे दोन्ही सरकार जबाबदार आहेत. या आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावे आणि या जुलमी शेतकरीविरोधी सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले.