Onion News | अधिकारीही झाले कांदा उत्पादकांचे ‘वैरी’; शेतकऱ्यांची लूट थांबेना


Onion News | ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे हे वर्ष उष्ण वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी आधीच पाऊस कमी पडल्याने कुठे पुर तर, कुठे दुष्काळ अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना राज्यातील प्रमुख पीकांपैकी एक असलेल्या कांदा या पीकावर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लादली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडलेले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रति क्विंटल ६०० रुपये इतके अनुदान देण्यात येत असून, तेदेखील देण्यासाठी सरकारकडून दिरंगाई केली जात आहे. या सर्व स्थितीत शेतकरी आधीच चिंतेत असून, तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली जात आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबाबत रोषाचे वातावरण आहे. आधीच सुरू असलेली शेतकऱ्यांच्या विरोधातील ही स्थिती कमी होती की आता, अधिकाऱ्यांनीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. याबाबतचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Onion News)

Onion Subsidy | जीआर आला; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान

Onion News | नेमकं प्रकरण काय..?

या प्रकरणी तालुका कृषी विभागाच्या अंतर्गत पीकविमा कंपन्यांमार्फत कांदा लागवडीची नोंद घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून ५०० रुपये आकारल्याचा प्रकार घडला आहे. तर, याबाबत सखोल चौकशी करून कांदा लागवड सर्व्हेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या दोषी कर्मचारी तथा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तालुका कृषी कार्यालयातर्फे कांदा लागवडीचा सर्व्हे सुरू असून, हा सर्व्हे करण्यासाठी नेमलेले कर्मचारी ही नोंद करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्याकडून ५०० रुपये घेऊन कांदा लागवडीची बोगस नोंदी करीत आहेत.

Onion Export | कांदा निर्यात बंदिवर काय म्हणाले पालकमंत्री दादा भुसे..?

फोन पे द्वारे लाच घेऊन केली बोगस नोंदी…

ही घटना तालुक्यातील विझोरा या गावात घडली असून, हा कांदा लागवडीचा सर्व्हे करणाऱ्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने प्रत्येक शेतकऱ्यांकडून तब्बल ५०० रुपये हे क्यू आर कोडद्वारे घेऊन बोगस नोंदी केलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडून क्यू आर कोडच्या तसेच फोन पेच्या माध्यमातून पैसे घेतले आहेत. कांदा लागवडीच्या सर्व्हेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार सुरू असून, या घडलेल्या प्रकाराची आपल्या स्तरावरून सविस्तर चौकशी करावी. तसेच या प्रकरणातील दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Onion News)