Crop Insurance | पिक विमा मिळाला नाहीतर…; शेतकऱ्यांसाठी शिंदे गटाचे आमदार आक्रमक


Crop Insurance | हे वर्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी काहीसे निराशाजनकच राहिले. आधीच पावसाने मारलेली दडी तानंतर जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी पीकं उभी केलीत. तर, त्यातही अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला. अवकाळीमुळे रोगांचा प्रादुभाव वाढल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. त्यात आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागांत अवकाळीने हजेरी लावली असुन, पुन्हा एकदा उभे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेले आहे. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केलेला पीक विमा हा शेतकऱ्यांना वेळेत न मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार संतापले आहेत.

 दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या वकतव्यांमुळे चर्चेत असतात. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार संतोष बांगर हे आक्रमक झाले असून, पुढील चार दिवसात शेतकऱ्यांना पिक विमा न मिळाल्यास माझ्या इतकं वाईट कोणी नाही, असा सज्जड दमच आमदार बांगर यांनी कृषी अधीक्षकांना दिला आहे.  येत्या चार दिवसांत जर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलने आक्रमक आंदोलन होईल, असा सूचक इशारा आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे. (Crop Insurance)

Crop Insurance | शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या नाहीतर..; खासदाराचा प्रताप

तक्रार केली असूनही, पिक विमा मिळत नाही

हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेत पीकांचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घटले असून, यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. दरम्यान, आर्थिक मदत म्हणून पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली असूनही, पिक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची भेट घेतली. यावेळी, बांगर यांनी कृषी अधीक्षकांना पिक विम्यावरुन चांगलेच खडेबोल सुनावले होते. तसेच यावेळी त्यांनी “जर येत्या चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही, असा सज्जड दम त्यांनी कृषी अधीक्षकांना दिला.

Crop Insurance | ‘या’ योजनेचा लाभ कसा घेणार..?; वाचा सविस्तर

Crop Insurance | काय आहे १ रुपयात पीक विमा योजना..?

गारपीट, दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अशा इतर अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. दरम्यान या काळात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा फायदा घेत असून, नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांची उभी पिकं वाया जातात. अशा परीस्थितीत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केलेली आहे. तर, महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला असून, यानुसार सर्वसमावेशक पीक विमा योजना ही पुढील 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्यात येणार असून, त्यानुसार शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येतो. (Crop Insurance)