Onion Export Ban | भारतातील कांदा निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकरी मालामाल


Onion Export Ban | भारतीय कांद्याला जगभरात मोठी मागणी असते. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्यामुळे इतर देशांनी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी इतर कांदा उत्पादक देशांतून कांदा मागवला. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील शेतकरी रडत असून, इतर देशातील आणि विशेषतः पाकिस्तानमधील कांदा उत्पादक शेतकरी हे मालमाल होत आहेत.

Onion Export Ban | पाकिस्तानी शेतकऱ्यांचे कैवारी कोण?

दरम्यान, या प्रकरणी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की,”इथे माझा शेतकरी उपाशीपोटी झोपत असताना पाकिस्तानमधील शेतकरी मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कांदे विकून चांगला मालामाल होत आहे. यामुळे नेमके पाकिस्तानी शेतकऱ्यांचे कैवारी कोण? असा प्रश्‍न खासदार कोल्हे यांनी संसदेत उपस्थित केला. केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणाबाबत कोल्हे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. राष्ट्रपती महोदयांनी राष्ट्र सर्वोपरी असल्याचे सांगितले होते. पण राष्ट्र हे केवळ इमारती, पायाभूत सुविधा तसेच अर्थसंकल्पातील आकड्यांनी राष्ट्र सर्वोपरी बनत नसून, आपल्या देशवासीयांच्या देशभक्तीने राष्ट्रनिर्माण होत असते. मात्र सध्या देशवासीय भीतीच्या वातावरणात जगत आहेत.(Onion Export Ban)

Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष उत्पादकांनाही

दरम्यान, यावेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या धोरणाबाबत खा. अमोल कोल्हे म्हणाले की, “कांदा निर्यात बंदीमुळे माझा कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. एकीकडे सरकार पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचा वल्गना करत असताना, दुसरीकडे मात्र त्याच पाकिस्तानातून युरोपला कांदा पुरवठा होत आहे. तसेच भारतात कांदा निर्यात बंदी लादल्याचा फायदा हा आता पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना होत असून, इथे कंबरडे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोडले जात आहे. यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी ही तत्काळ हटवण्यात यावी.

Onion News | कांद्याला हमीभाव न मिळाल्यास…; शेतकऱ्यांचा इशारा

केंद्राच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटतेय

तसेच, एकीकडे सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करत असताना, दुसरीकडे माझ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र दुपटीने घटत चालले आहे. २०१३ मध्ये डीएपीची बॅग ही केवळ ५६० रुपयांना होती आणि तीच बॅग आता १,१०० रुपयांना विकली जात आहे. कांदा २० रुपये प्रतिकिलो होता तोच कांदा आता ८ ते १० रुपये किलो इतका आहे. सोयाबीनच दर हे ६ हजारांवर होते. ते आता ४ हजार ५०० रुपयांवर आहे. केंद्राच्या अशा धोरणांमुळे आमच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न हे वाढण्याऐवजी दुपटीने घटत असल्याचे वास्तव शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाषणात मांडले.(Onion Export Ban)