Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष उत्पादकांनाही


Onion Export Ban | कांदा आणि द्राक्ष हे नशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकं आहेत. नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्ष पीकांचे आघाडीवर उत्पन्न घेतले जाते. नाशिकमधील लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील अग्रेसर बाजारपेठ आहे. तर, नाशिकमधील निफाड तालुका हा द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही कांदा, डाळिंब आणि द्राक्ष यावरच अवलंबून आहे. द्राक्षाच्या उत्पन्नातून दरवर्षी नाशिकमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते.मात्र, यावर्षी या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांना हताश केले आहे. निर्यात बंदीमुळे कांदा आणि अवकाळीमुळे द्राक्ष दोन्हीही पिकांनी नाशिकच्या शेतकऱ्यांना निराश केले. (Onion Export Ban)

दरम्यान, केंद्राच्या निर्यात बंदीच्या निर्णयाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना आणि कांदा, द्राक्ष पिकाला मोठा फटका बसत आहे. बांगलादेशला निर्यात होणारा कांदा बंद झाल्यामुळे बांगलादेशने भारतातून येणाऱ्या द्राक्षावर आयात शुल्क वाढविले आहे. यामुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या तोट्याचे परिणाम हे शेतकऱ्यांनाही भोगावे लागत आहे. कारण, यामुळे आता देशांतर्गत बाजारपेठांमध्ये द्राक्षाचे दर हे घसरले आहे.

Onion Export Ban | देशातील कांदा निर्यातबंदी ठरतेय पाकिस्तानसाठी मोठी संधी…!

Onion Export Ban | अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांकडून वसूल

गेल्या वर्षी केंद्र शासनाने कांद्यावर निर्यातबंदी लादल्याने बांगलादेशला निर्यात होणारा कांदा बंद झाला आणि यामुळे कांद्याचे देशांतर्गत दर खाली आपटले. त्यावेळी बांगलादेशने इतर देशांमधून कांदा आयात केला. मात्र, यानंतर भारतातून येणाऱ्या मालावर आयात शुल्क हा तब्बल १०४ रुपयांनी वाढवला. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च व्यापारी शेतकऱ्यांकडून वसूल करत असून, यामुळे आता द्राक्षालाही निर्यात बंदीची चपराक बसली आहे. कांद्याच्या पाठोपाठ आता द्राक्ष पीकही फेल ठरत असल्याचे चित्र असून, यामुळे शेतकरी खचला आहे.

(Onion Export Ban)Onion Export Ban | काय सांगता! नाशकात कांदा निर्यातबंदीमुळे शूभकार्य रखडली

द्राक्षांना कवडीमोल दर…

नाशिकची द्राक्षे ही चविष्ट असल्याने त्यांना संपूर्ण जगभरातून मोठी मागणी असते. मात्र, केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याने सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनात रोष आहे. कांदा आणि द्राक्ष उत्पादनातून साधा उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. उत्तर भारतात थंडी अजूनही कमी होत नसल्याने खरेदीदार येत नाहीये. त्यामुळे नाशिकची ओळख आणि शान असलेले द्राक्षे सीजनच्या सुरुवातीलाच अगदी कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे. ऐन हंगामातच ही भयावह परिस्थिती ओढवल्याने शेतकरी संतापले आहेत. (Onion Export Ban)