Soyabean | कांदा, द्राक्षांनंतर आता शेतकऱ्यांची ‘ही’ आशाही संपली…


Soyabean |  यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आव्हानांना सामोरे जात, पीक उभे केले. मात्र, त्या पीकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदाचं वर्ष हे शेतकऱ्यांसाठी प्रचंड निराशेचं राहिलं कांदा, द्राक्ष, भाजीपाला आणि आता सोयाबीनही कुठल्याच पीकाला मनासारखा भाव मिळत नसल्याने बळीराजा खचला आहे.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठे आस्मानी संकटे पेलत सोयाबीन पीक घेतलं. मात्र, आता बाजारात सोयाबीन हे कवडीमोल दराने विकले जात आहे. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. यंदा सुरवातीलाच पावसाने दडी मारल्याने पेरण्यांना झालेला उशिर, तसेच ऐन फुलोऱ्याच्या काळात पडलेला पावसाचा खंड, यानंतर ‘यलो मोझ्याक’ यासर्व संकटांमुळे यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.(Soyabean)

Farmers Strike | शेतकरी पुन्हा गाजवणार ‘दिल्ली’

एकतर आधीच उत्पादन कमी आणि ते कमी होतं की काय आता दरही वेगाने घसरले. गेल्या तीन वर्षांपूर्वी सोयबीनचे दर हे दहा हजारच्या पार होते आणि तेच दर आता गेल्या दोन वर्षांपासून पाच हजाराच्या वरही जायचे नाव घेत नाही. दरम्यान, आता हंगाम सुरू होऊनच चार महिने उलटले तरीही दर वाढत नसून, उलट दिवसेंदिवस भावात अधिकाधिक घसरण होत आहे. आता तर अवघ्या ४ हजारांवर येऊन ठेपले असून, यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संतापले आहे.

Soyabean | सरकारच्या हमीभावापेक्षा कमी दर

यंदा सोयाबीनच्या पीकाच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारतर्फे ४ हजार ६०० रुपये इतका हमीभाव जाहिर करण्यात आला आहे. किमान यापेक्षा थोडातरी वर भाव अपेक्षित असताना, याउलट बाजारात सध्या सरासरी चार हजार दोनशे रुपये इतका दर मिळत आहे. हे दर आणखी कमी होता की काय? या भीतीने शेतकरी आताच सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. तर, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने केंद्राच्या हमीभावापेक्षाही खालच्या दराने सोयाबीन विकलं जात आहे.(Soyabean)

Onion Export Ban | भारतातील कांदा निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकरी मालामाल

जिल्हा निबंधकांचे आश्वासन

दरम्यान, याला प्रतिबंध घालण्याची जबाबदारी ही संबंधित बाजार समितीची असून, मात्र तसं काही होताना दिसत नसल्यामुळे जिल्हा निबंधकांनी सर्वच बाजार समित्यांना शासनाचे परिपत्रक पाठवले असून, ज्या सोयाबीनची सरकारच्या हमीभावापेक्षा कमी दराने विक्री झाली असेल त्या सोयाबीनची माहिती मागवली आहे. तर यासंदर्भात काही तक्रार आल्यास यावर आम्ही कारवाई करू असं आश्वासनही यावेळी जिल्हा निबंधकांनी दिले आहे.