PM Kisan | ‘पीएम किसान’चा लाभ हवा असेल तर, आताच ‘या’ बाबींची पूर्तता करा


PM Kisan | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का असेना, पण सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक नवनवीन आणि फायदेशीर योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या आहेत. मात्र, त्या योजना किंवा त्याबद्दलची शेतकरी बंधवांपर्यंत योग्य वेळेत पोहोचत नसल्यामुळे त्या योजनांपासून अनेक शेतकरी वंचित राहतात. अशीच एक योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणली असून, या योजनेबद्दल आणि योजनेच्या निकषांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या योजनेचा १६ वा हप्ता आता लवकरच जमा होणार असून, यासाठी शेतकऱ्यांना आताच काही बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, या लाभदायक योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढील कामे आजच पूर्ण करणे आवश्यक आहे. जर, तुम्हीही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ मिळवू इच्छित असाल तर हे वृत्त सविस्तर वाचा आणि कागदपत्रांची पूर्तता करून या निधीचा लाभ घ्या.(PM Kisan)

PM Kisan | ‘या’ योजनेसाठी सरकारने घातली नवी अट

केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात असून, त्यापैकी ‘पंतप्रधान किसान निधी’ ही जगातील सर्वात मोठी DBT योजना आहे. ज्याचा लाभ आतापर्यंत देशातील करोडो शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा या योजनेच्या १६ व्या हप्त्याचे लवकरच वितरण केले जाणार आहे. या योजनेसोबतच सरकारची नवीन ‘किसान भाई’ या योजनेचाही लाभ मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर आताच नोंदणी करा.

PM Kisan | या बाबींची पूर्तता करणे आवश्यक

१. आधार व बँक खाते सीडिंग करावे.
२. जमिनीची कागदपत्रे अपलोड करावे
३. शेतकऱ्यांनी त्यांचे नाव आणि इतर माहिती योग्य पद्धतीने टाकावी.
४. यासाठी eKYC करणे. या बाबींची पूर्तता करणे आवश्यक असून, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आताच या गोष्टी पूर्ण करा.

PM Kisan Yojna | किसान योजनेचा हप्ता लवकरच होणार जमा

या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये हे तीन हप्त्यांमध्ये मिळतात. २४ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक मदत होऊन हातभार लागावा हा या योजनेच्या मागील मुख्य उद्देश आहे.(PM Kisan)