Onion Export Ban | सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल..?; नेमकं प्रकरण काय


तनुजा शिंदे : Onion Export Ban | ८ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली होती. यानंतर तेजीत असलेले कांद्याचे दर हे खाली आपटले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल रोष पसरला आहे. मात्र, रविवार रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्राने ३० हजार टन कांदा निर्यातीस मंजूरी दिली असल्याचे वृत्त समोर आले होते.

मात्र, त्याबाबतचे कुठलाही अधिकृत अध्यादेश काढण्यात आला नव्हता. मात्र, आता प्रत्यक्षात केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी ८ डिसेंबर २०२३ रोजी केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी केली होती. तर, ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत कायम ठेवली आहे.(Onion Export Ban)

दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांची ही दिशभुल करण्यात आली असून, याप्रकाराचा शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर, आता आधी जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी ही ३१ मार्च या अंतिम मुदतीपर्यंत कायम राहणार आहे. तर, कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नसून, त्यात कोणताही बदल झालेला नसल्याचे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

Onion Export Ban Lift | सरकार शेतकऱ्यांसमोर नमले..! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली.

Onion Export Ban | निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका बसणार

कांदा निर्यात बंदी हटवल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच. दुसऱ्या दिवशी कांद्याच्या बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. काल तब्बल ६०० रुपयांनी भाव वाढले असून, आज हे वृत्त चुकीचे असल्याचे समजताच भाव पुन्हा एकदा खाली आदळले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील सामान्य नागरिकांना केंद्र स्थानी ठेऊन आणि महागाईचे चित्र पुसट करण्यासाठी केंद्राने कांदा निर्यात बंदी लागू केली होती. यामुळे सामान्यांचा फायदा करण्यासाठी केंद्राने शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली असून, यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या वोट बँकवर परिणाम होणार आहे.

कोणत्या बाजार समितीत कसे भाव..?

दरम्यान, आज सकाळ सत्रात लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची सरासरी आवक ही ८ हजार ५०० क्विंटल इतकी झाली असून, तर कमीत कमी ८०० तर सरासरी १,६५० इतका भाव मिळाला. येवला – अंदरसूल बाजार समितीत ५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून, येथे कमीत कमी ३५० रुपये तर सरासरी १ हजार ६७५ रुपये असा भाव मिळाला होता. लासलगाव – विंचूर बाजार समितीत तबल १० हजार ३०० क्विंटल इतक्या कांद्याची आवक झाली असून, येथे कमीत कमी ९०० रुपये तर सरासरी १ हजार ६५० रुपये असा दर होता. तर, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत ८ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून, येथेही कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १ हजार ७०० रुपये असा भाव होता.

Onion Export Ban | कांद्याची तस्करी करण्याचा नाशिकच्या निर्यातदारांचा प्लॅन फसला

कृषी मंत्रालय रब्बी कांद्याचे मूल्यांकन करणार

यंदा पाऊसाचे प्रमाण हे अत्यल्प असल्याने महाराष्ट्रात हिवाळी कांद्याच्या उत्पादनाची नोंद ही अत्यंत कमी झाली आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन हे २२.७ दशलक्ष टन इतके होण्याचा अंदाज होता. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. येत्या काही दिवसांत कृषी मंत्रालयाचे अधिकारी हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये रब्बी हंगामातील कांद्याच्या व्याप्तीचे मूल्यांकन करण्याची शक्यता आहे.(Onion Export Ban)