Nashik News | पाच तालुक्यांत ‘कृषी भवन’; मंत्री भूसेंच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना दिलासा


Nashik News | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व कृषी कार्यालय हे एका छताखाली असावेत या उद्देशाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर एकाच ठिकाणी कृषी विभागाची सर्व कार्यालये यावेत. यासाठी राज्य शासनाने कृषी भवन उभारण्यास मंजूरी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, मालेगाव, येवला आणि चांदवड या पाच ठिकाणी तालुका स्तरावर कृषी भवन उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी लोकसभा निवडणूकांची आचार संहिता लागण्यापुर्वी या पाचही तालुक्यांच्या कृषी भवनासाठीचा निधी मंजूर करुन घेतला असून तो तीन वर्षात टप्याटप्याने वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Nashik News)

Nashik | नांदगावमधील बाजार समितीत शेतकऱ्यांना शिवीगाळ

कृषी विभागाची कार्यालये ठिकठिकाणी विखुरलेली असतात. जिल्हा स्तरावरील तसेच, तालुका स्तरावरील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीमध्ये असणे. हे कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे. कृषी विभागाचा लोकसंपर्क लक्षात घेता, विविध विभाग विखुरले गेल्याने प्रशासकीयदृष्टया व शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. शिवाय कार्यरत असलेल्या कार्यालयांसाठी मोठ्या प्रमाणावर परीरक्षणापोटी निधी द्यावा लागतो.

त्यामुळे खर्चही वाढत जातो. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याने, एकाच छताखालील अद्ययावत कृषी संकुल बांधणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कृषी विभागातील, इगतपुरी, दिंडोरी, मालेगाव, येवला आणि चांदवड या पाच ठिकाणी तालुका स्तरावर कृषी भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधीही मंजूर देखील मंजूर करण्यात आला असून मंत्री भुसे यांनी हे मंजूर करून घेतले आहे.

Nashik News | शेतकऱ्यांवरच रेशनचे गहू खाण्याची वेळ

तसेच विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय सध्या नाशिकरोड येथे आहे. परंतु, ते मध्यवर्ती ठिकाणी घेण्यासाठी रामेती (कृषी प्रशिक्षण संस्था) उंटवाडी येथे उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी खत चाचणी प्रयोगशाळा, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, मृद चाचणी प्रयोगशाळा, कीटकनाशक अंश तपासणी प्रयोग शाळा यांचा समावेश राहणार आहे. येवला येथे तालुका कृषी कार्यालय आणि फळ रोपवाटिका, मालेगाव येथे उपविभागीय कृषी अधिकारी, चार मंडळ कृषी अधिकारी आणि फळ रोपवाटिका कार्यालय राहणार आहे. चांदवड, दिडोरी, इगतपुरी येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासाठी कृषी भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने निधीही मंजूर केला असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली.