Onion Rate | सात दिवसांनंतर बाजार समित्या सुरू; असे आहेत आजचे कांद्याचे भाव…


Onion Rate | गेल्या सात दिवसांपासून हमाली मापारी प्रश्नी बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीत (lasalgaon bajar samiti) अखेर आजपासून कांदा लिलाव सुरु झाले आहे. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांनी या कांदा लिलावाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दरम्यान, आठवड्याभरानंतर सुरू झालेल्या या कांदा लिलावात सरासरी 1,550 रुपये असा दर मिळाला. तर एका वाहनातील कांद्याला 2,900 रुपये असा दर मिळाला.(Onion Rate)

मागील आठवडाभरापासून येथे हमाली मापारी प्रश्नी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद होते. लेव्हीप्रश्नी व्यापारी व माथाडी मंडळात सुरू असलेल्या वादामुळे गेल्या आठ दिवसांपासून कांदा लिलाव बंद करण्यात आले होते. यानंतर बुधवारी संचालक मंडळाची बैठक झाली असून, यानंतर आज अखेर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहेत.

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका

Onion Rate | उन्हाळ कांद्याला इतका दर..?

मात्र या लिलावाकडे स्थानिक बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असून, नवीन परवानेधारक आणि विंचूर उपबाजार समितीतील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होत लिलाव सुरू केले. दरम्यान, याठिकाणी आज उन्हाळ कांद्याला सरासरी १,५०० रुपयांचा भाव मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी संघटनांनी कांदा विक्री केंद्र सुरु केले होते. तर, या दोन कांदा विक्री केंद्रांच्या माध्यमातून कांदा लिलाव झाले. यानंतर काल पुन्हा लासलगाव बाजार समितीत संचालक मंडळाची बैठक पार पडली आणि यात आजपासून कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Onion Export Ban | सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार; कांदा निर्यात बंदी कायम राहणार

व्यापारी सहभागी झाले नाहीच..

दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या या लिलावात व्यापारी सहभागी न झाल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला असून, असे असले तरीही आजपासून सुरु झालेल्या या कांदा लिलावात स्थानिक व्यापारी सहभागी झाले नाही. मात्र, अखेर आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ अशी ख्याती असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाल्याने नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Onion Rate)

यावर्षी अनेक करणांमुळे कित्येकवेळा बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. बाजार समित्यांमधील अंतर्गत वाद किंवा व्यापारी आणि इतर घटकांतील वाद आणि मागण्या हेच यामागील प्रमुख कारण राहिले आहे. मात्र, यात काही संबंध नसतानाही वरिष्ठ पातळीवरील भांडणात नुकसान हे नेहमीच शेतकऱ्यांचे होते. यामुळे बाजार समित्यांच्या या मांमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.