Rain Alert | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; वादळी वारा आणि गरपीटीचा इशारा


Rain Alert |  यंदाचे वर्ष हे ‘अल निनो’चे म्हणजेच उष्ण वर्ष होते. त्यामुळे यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली होती. एवढंच नाहीतर, आता उन्हाळ्यातही विक्रमी उष्णता वाढली आहे. राज्यातील हवामान सातत्याने बदलताना दिसत असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसासह गारपीट देखील होत आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ दिला असून, वादळी वाऱ्यासह गारपीटीचाही इशारा दिला आहे. तसेच हवामान विभागाने ५० ते ६० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तविली आहे. 

Rain Alert | ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

दरम्यान, विदर्भातील अकोला, वाशिम व यवतमाळ या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच या भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. केवळ विदर्भच नाहीतर काही मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पुस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Rain Alert | ‘या’ भागात बरसणार अवकाळी..

दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. या अवकाळी पावसाचा या भागांतील शेती पिकांना फटका बसला असून, आंबा, लिंबू, भाजीपाला, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

Rain Alert | नववर्षाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांना बसणार अवकाळीचा तडाखा!

अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यात सध्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट सुरु आहे. या पावसामुळे या जिल्ह्यांतील काही ठिकाणी वीज पडल्याच्याही घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. एकीकडे या जिल्ह्यांत आधीच अवकाळी पाऊस बरसत असताना, अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. एकूणच विशेषत: मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (Rain Alert)