Onion Export Ban | कांद्याची तस्करी करण्याचा नाशिकच्या निर्यातदारांचा प्लॅन फसला


Onion Export Ban |  गेल्या अनेक दिवसांपासून देशात कांदा या पीकावर केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली आहे. मात्र, तरीही छुप्या मार्गाने कांद्याची तस्करी होत असल्याचे प्रकरणं उघडकीस आले होते. भारतातील कांद्याची अनेक देशांत निर्यात होत असते. कारण भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी असते. बांगलादेश, मलेशिया व संयुक्त अरब अमिराती (युएई) या तीन देशांत जास्त निर्यात होते.

दरम्यान, यातच आता नाशिकमधून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. येथे टोमॅटोच्या नावाखाली बाहेरील देशात कांद्याची तस्करी होत असल्याची घटना समोर आली असून, विशेष म्हणजे थोडाफार नाहीतर, या टोमॅटोच्या कंटेनरमध्ये तब्बल ८२.९३ मॅट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणात हा कांदा टोमॅटोखाली लपवून बाहेरच्या देशात पाठवला जात होता. या कांद्याची संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे तस्करी केली जात होती. तर, याबाबतची गोपनीय माहिती ही सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली असून, त्यांनी ही कारवाई केली आहे. (Onion Export Ban)

Onion News | अधिकारीही झाले कांदा उत्पादकांचे ‘वैरी’; शेतकऱ्यांची लूट थांबेना

नाशिकच्या दोन निर्यातदारांची कल्पना

देशात कांदा निर्यातबंदी लागू असताना तब्बल ८२.९३ मॅट्रिक टन इतका कांदा यूएईमध्ये पाठवला जाणार होता. याबाबतची माहिती सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली असता, त्यांनी तातडीने हा कांदा जप्त करत यातील दोषींवर कारवाई केली आहे. यात मुख्य दोषी हे नाशिकचेच दोन निर्यातदार असून, या दोघांनी टोमॅटोची निर्यात होणाऱ्या या कंटेनरमध्ये टोमॅटो पेट्यांमागे कांदा पॅक केला होता व हा कांदा यूएईकडे पाठवण्याची तयारी केली होती.

मात्र, माहिती मिळाल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या नागपूर टीमने मुंबईत जाऊन या संशयित कंटेनरची तपासणी केली असता, त्यांना कंटेनरच्या समोरच्या भागात टोमॅटोचे बॉक्स आणि या पेट्यांच्यामागे कांद्याची पोती लपवल्याचे आढळून आले. दरम्यान, हा कांदा तो यूएईला पाठवणार असल्याचेही उघडकीस आले. (Onion Export Ban)

Onion Subsidy | जीआर आला; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान

Onion Export Ban | निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत

कांद्याचे उत्पादन यंदा कमी असल्याने आणि परदेशातून यांना मागणी जास्त असल्याने सुरुवातीला कांद्याचे दर हे तब्बल ४ हजारांच्या पार होते. यामुळे कधी नव्हे ते कांदा उत्पादकांना कांद्याने हसवले होते. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना निराशा केले आणि ८ डिसेंबर पासून कांदा निर्यातीवर बंदी घातली.

देशातील स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे दर हे नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतला असून, ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार असल्याचे परिपत्रक देखील सरकारने काढले होते. मात्र, याचा मोठा फटका कांदा उत्पादकांना बसला असून, यामुळे कांद्याचे भाव खाली आपटले. यानंतर सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकरी आक्रमक असून, कांदा उत्पादनाचे प्रमुख केंद्र असलेल्या नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. (Onion Export Ban)