Onion Subsidy | जीआर आला; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान


Onion Subsidy | केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाआधी चार हजारांवर असलेल्या कांद्याचे दर हे आता खाली आले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शतेकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, आता कांदा उतपडक शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति क्विंटल साडे तीनशे रुपये या कांदा अनुदानाबाबत दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रातील कांदा अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्यासाठी निधी वितरण करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली असून, या संदर्भात एक महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आता कोणत्या शेतकऱ्यांना आणि किती अनुदान दिले जाणार हे जाणून घेऊयात. राज्यातील कांदा उत्पादकांना २०३ मध्ये मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी हे अनुदान सरकारतर्फे दिले जाणार आहे. (Onion Subsidy)

Onion Export | कांदा निर्यात बंदिवर काय म्हणाले पालकमंत्री दादा भुसे..?

Onion Subsidy | या टप्प्यात इतके अनुदान मिळणार..?

दरम्यान, त्यानुसार पहिल्या टप्प्यात तब्बल दहा कोटी पेक्षा कमी अशी वर्गवारी करून दहा हजार रुपयांच्या पहिला टप्प्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दहा हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात चार हजार रुपये असे आतापर्यंत तब्बल २४ हजारांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. पण अद्यापही मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. तर, या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनात तब्बल ३०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. याच निधी पैकी २११ कोटींचा निधी वितरित करण्यासाठीचा जीआर हा ८ फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला असून, या निधीतून आता 20 हजार रुपये प्रति शेतकरी इतके अनुदान देण्याबाबत मंजुरीही देण्यात आलेली आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना कीती अनुदान..?

गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या कांदा अनुदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यात १० हजार आणि तिसऱ्या हप्त्यात ४ हजार रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांना आता चौथ्या हप्त्यात दुप्पट म्हणजेच तब्बल २० हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी एकुण २११ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून, राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. ज्यांची एकुण कांदा अनुदानाची रक्कम ही ४४ हजारांच्या आत आहे. त्यांना मागील २४ हजार वगळून, उर्वरित पूर्ण रक्कम मिळेल. तर, अनुदानाची रक्कम ही ४४ हजारांपेक्षा अधिक असणाऱ्यांना आता २० हजार रुपये मिळणार असल्याचे या जीआरच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. (Onion Subsidy)

Onion Export Ban | भारतातील कांदा निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकरी मालामाल

११ महिन्यांपासून शेतकऱ्यांसोबत खेळ मांडला – भरत दिघोळे

दरम्यान, “कांदा अनुदान वितरीत करण्यात राज्य सरकारने केलेला वेळखाऊपणामुळे शेतकरी संतापलेले असून अवघे साडेतीनशे रुपये अनुदान देण्यासाठी सरकारने मागील ११ महिन्यांपासून शेतकऱ्यांसोबत खेळ मांडला आहे. कांद्याची अनुदान रक्कम ही हप्त्यांमध्ये देण्याऐवजी एकरकमी द्यायची होती. ही अनुदानाची रक्कम टप्याटप्यांत देत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकार बद्दल नाराजीचा सूर आहे. सरकारने कांद्याला अनुदान देण्याऐवजी थेट हमीभावाचीच योजना तयार करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.