Sarkari Yojna | ‘या’ पीकांच्या लागवडीवर सरकार देतंय भरघोस अनुदान


Sarkari Yojna | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का असेना, मात्र केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही निर्णय घेतले जात आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभासाठी त्यांना प्रोत्साहन देत असून, यासाठी शासनातर्फे अनेक नवनवीन योजना या सातत्याने राबविल्या जात आहेत. दरम्यान, आता सरकार शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत आंतरपीक मोहिमेत ऑलिव्ह, हळद व अद्रक या पीकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देत असून, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेलच. मात्र, देशातील कंद व मसाला पिकांचेही उत्पादन वाढेल. या दृष्टीने शेतकऱ्यांना ऑलिव्ह, हळद व आले पिकांची लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे.(Sarkari Yojna)

तर, सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी हे या आंतरपीक मोहिमेसाठी अर्ज करू शकणार आहेत. काय आह ही योजना?, किती अनुदान मिळणार?, काय आहेत अटी? हे जाणून घेऊयात…

Goverment Scheme | केंद्र सरकारच्या या योजनेमुळे होईल वीज माफ; असा करा अर्ज

Sarkari Yojna | कोणत्या पीकावर किती अनुदान मिळणार?

बिहार राज्य कृषी विभागाने दिलेल्या महितीनुसार, या मोहिमेअंतर्गत बिहार सरकार राज्यातील शेतकऱ्यांना ऑलिव्ह , आले लागवडीसाठी ५० टक्के इतके अनुदान देणार आहे. सोबतच हळदीच्या लागवडीवर तब्बल ४० टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे. ऑलिव्हच्या युनिट खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच ४१ हजार रुपये दिले जाणार आहेत. यासोबतच हळदीच्या २ लाख २३ हजारांच्या युनिट किंमतीवर तब्बल ४० टक्के म्हणजेच १ लाख १३ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तर, आल्याच्या ७६ हजार रुपयांच्या युनिट किमतीवर ५० टक्के म्हणजेच ३८ हजार रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.

हे शेतकरी पात्र..?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान ४ ते ५ एकर इतकी शेती असणे बंधनकारक आहे. तसेच बिहार राज्यातील अररिया, भोजपूर, बक्सर, गोपालगंज, कटिहार, मधेपुरा, मधुबनी, मुंगेर, पूर्णिया, सिवान, सुपौल आणि सारण या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Sarkari Yojna)

Goverment Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारची नवी योजना

कसा कराल अर्ज..?

  • नोंदणीसाठी शेतकऱ्यांना फलोत्पादन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर तुम्हाला होम पेजवरील ऑनलाइन पोर्टलच्या पर्यायावर क्लिक करा.
  • एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत आंतरपीक मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठीचा पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर नियम आणि अटी दिसतील.
  • या अटी व शर्ती वाचून सहमत या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली माहिती भरायची आहे
  • नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा. (Sarkari Yojna)