Nashik Onion News | कर्नाटकच्या कांद्याला वेगळा न्याय; नाशिकमध्ये शेतकरी संतप्त, लिलाव बंद


Nashik Onion News :  मागील वर्षी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली. यामुळे आधीच कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन पुकारले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांची नाराजी लक्षात घेऊन सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लादण्यात आला. यामुळे निर्यात बंदी हटवली असली तरीही स्थानिक बाजारात कांद्याचे भाव काही वाढले नाही. 

कर्नाटकच्या गुलाबी कांद्यावर निर्यातशुल्क नाही 

दरम्यान, यापूर्वी सरकारने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली होती. तर, आता कर्नाटकच्या गुलाबी कांद्यावरील (Onion from Karnataka) ४० टक्के निर्यातशुल्क (Export duty) हटवण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रातील कांद्यावरील (Maharashtra) निर्यात शुल्क कायम असल्याने आता नाशिकमधील शेतकरी आक्रमक झाले असून, लासलगावमधील खासगी बाजार समितीत सुरु असलेले कांदा लिलाव संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. केंद्र सरकारच्या या महाराष्ट्र शेतकरी विरोधी धोरणाचा शेतकऱ्यांकडून यावेळी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

 Onion Price | कांदा उत्पादकांसाठी आनंदवार्ता; कांद्याचे भाव वाढले

Nashik Onion News | गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय

दरम्यान, केंद्र सरकारने निर्यात बंदी हटवल्यानंतर कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले होते. मात्र, आता कर्नाटकमधील गुलाबी कांद्यावरील हे ४० टक्के निर्यातशुल्क हटवण्यात आले आहे. आधी गुजरातच्या कांद्याबाबत आणि आता कर्नाटकच्या कांद्याबाबतच्या या सरकारच्या निर्णयामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, लासलगाव येथील खासगी बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहे.(Nashik Onion News)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरच हा अन्याय का?

तर, केंद्र सरकार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोपही या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आला. हे केंद्र सरकार गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय देत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरच हा अन्याय का? असा सवालही या संतप्त शेतकऱ्यांनी केला. तसेच येत्या आठ दिवसांत महाराष्ट्रातील कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क हटवला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.(Nashik Onion News)

Onion News | निर्यात शुल्काबाबत अस्पष्टता; सरकारच्या गोंधळामुळं कांदा बंदरावर सडतोय..?