Monsoon Tracker | उत्तर महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार


Monsoon Tracker | यंदाचे वर्ष हे अल निनोचे वर्ष असल्याने यंदा उष्णता जास्त असून, सर्वच भागांत पावसाची आतुरतेने वाट बघितली जात आहे. तर, दुसरीकडे शेतकरीही पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान, यंदा मान्सून वेळेआधी म्हणजेच ३० मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला असून, यानंतर मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचेल याची महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

मान्सून केरळच्या सीमेवर ३० मे रोजी वेळेपूर्वी पोहोचला असला, तरी मुंबईत तो १० जून रोजी दाखल होऊ शकतो. तर उत्तर महाराष्ट्रात मान्सून १२ ते १५ जून या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वी हवामान विभागाकडून मान्सूनपूर्व पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यात येत्या दोन तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.(Monsoon Tracker)

Maharashtra Monsoon Updates | ‘या’ तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार

दरम्यान, यंदा मान्सून हा वेळेआधी केरळमध्ये पोहोचणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले असून, त्यांचा हा अंदाज खरा ठरला असला, तरी मान्सून महाराष्ट्रात सरासरी ज्या तारखेला दाखल होतो. त्याच तारखेला पोहोचणार आहे. तर, पाऊस लवकरच मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा देणार असून, उत्तर महाराष्ट्रात मॉन्सून १२ ते १५ जून या दरम्यान पोहोचणयाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, यापूर्वी वळिवाचा पाऊसही कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. 

Monsoon Tracker | या दरम्यान करा पेरणी 

दरम्यान, सध्या एकूणच वातावरणाची परीस्थिती तसेच वळीव आणि मान्सूनच्या आगमनाची वेळ पाहून महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठी आवश्यक जमीन ओली होण्यासाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच २० जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तर, सध्या सतत होत असलेल्या वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बाठर ओलीवर पेरणी करण्याचे धाडस करू नये, असे आवाहन हवामान खात्याने शेतकऱ्यांना केले आहे. (Monsoon Tracker)

Igatpuri | वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; वीज पडून दोन जनावरांचा मृत्यु