Maharashtra Monsoon Updates | राज्यात (Maharashtra News) सध्या उन्हाने कहर केला असून, तापमानाचा पारा हा वाढतच चालला आहे. त्यामुळे या उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळावा. यासाठी लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, रेमल या वादळामुळे मान्सून (Monsoon News) आता महाराष्ट्रात लवकर दाखल होणार आहे.
त्यामुळे लवकरच नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून येत्या १० किंवा ११ जूनला मुंबईत (Mumbai Rains) दाखल होणार आहे. १५ जूनपासून मुंबईत पाऊस सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर, १५ जूनपासून हा मान्सून महाराष्ट्र व्यापेल असेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पाऊस होण्याचाही अंदाज हवमान विभागाने वर्तविला आहे. (Maharashtra Monsoon Updates)
Igatpuri | वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; वीज पडून दोन जनावरांचा मृत्यु
Maharashtra Monsoon Updates | एकीकडे पाऊस दुसरीकडे दुष्काळ
केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून, महाराष्ट्रातही आता मान्सूनची चाहूल लागली आहे. दरम्यान, एकीकडे राज्यातील काही भागांत गेल्या अनेक दिवसांपासून उन्हामुळे लाहिलाही होत असून, शेतकऱ्यांनाही लागवडीसाठी पावसाची प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने येत्या एक ते दोन दिवसात विदर्भात तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान हे ४४ ते ४९ अंशापर्यंत जाणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
पाऊस व गारपिट होण्याचीही शक्यता
तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार, जून महिन्यात उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशच्या भागात उष्णतेची लाट कायम राहील आणि २९ मे पासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार असल्याने यामुळे अनेक राज्यांत पाऊस व गारपिटही होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच २ ते ३ दिवसांत पाऊस पडणार असून, यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. (Maharashtra Monsoon Updates)
Unseasonal Rain | राज्यात गारपीटीसह तूफान पाऊस; उभे पीक डोळ्यांसमोर वाहून गेले..!