Farmers News | शेतकऱ्यांनो जपा ! ‘या’ खतांमुळे होतात भयंकर मानवी आजार


Farmers News | सध्या शेतीत मोठ्या प्रमाणात आधूनिकीकरण आणले जात असल्याने सध्या तांत्रिक शेतीकडे सामान्य शेतकऱ्यांच्या कल वाढलेला आहे. याच आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेती पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरु असून, उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती नापीक होण्याची शक्यता वाढलेली आहे.

पुर्वी उत्पन्नाप्रमाणे पिकांसाठी खते घेतली जात होती म्हणुन रासायनिक खतांचा वापर टाळला जात होता. मात्र, कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळविण्याची स्पर्धा सध्या सर्वत्र सपरू असल्याने रासायनिक खतांचा भडीमार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परिणामी, जमिनीचा पोत घसरण्यासोबतच उत्पादित अन्नधान्याचा मानवी आरोग्यावरसुद्धा विपरित परिणाम होत असल्याचे घातक चित्र सध्या समोर येत आहे.

सध्याच्या काळात पीक चांगले राहण्याकरिता शेतकरी रासायनिक खते आणि औषधांचा भरमसाठ वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा दर्जा खालावत असून जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्त्वे नष्ट होताना दिसत आहेत. सध्या पिकांना रासायनिक खतांचा डोस न दिल्यास उत्पन्नातही घट येत असल्याचेही दिसून येत आहे. परिणामी शेतकरीही त्याचा अतिवापर करतात आणि सिंचन सुविधा मुबलक असल्याने त्यांना जमिनीतूनच जादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.

Farmers News | सध्या शेती करण्याची पद्धत बदलल्याचं चित्र

पुर्वी पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगी येत होती आणि या जनावरांची विष्ठाच खताचे काम करत असत. शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरते. त्यामुळे शेतजमिनीतील पोषक तत्त्वांना बळ मिळत होते तसेच जमिनीतील पोषक तत्त्वांना शेणखतापासून कोणतीही हानी पोहोचत नव्हती. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला आणि इतरही पिके घेता येत होती. परिणामी शेती उत्पादनांचा दर्जाही अत्यंत चांगला राहत होता. मात्र, सध्या शेती करण्याची पद्धत बदलल्याचं चित्र आहे.

Farmers News | रासायनिक खतांमुळे मानवी शरीराला धोका

दरम्यान, जिवाणू खतांचा वापर केल्याने जमिनीची शाश्वत सुपीकता टिकवून ठेवून आपण दीर्घकाळ शेती उत्पादन घेऊ शकतो. रासायनिक खतांमुळे मानवी शरीराला मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत असून रासायनिक खते शेतीसाठी वापरल्यामुळे पाण्यामधील कार्बोरेटचे प्रमाण दिवसेंदिवस वाढता आहेत. यामुळे लहान मुलांचे केस पिकणे, केस गळणे, अर्धांगवायू होणे, मुतखडा होणे यासारखे आजार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. म्हणुनच शेतीत रासायनिक खतांपेक्षा जैविक खते वापरावी असा सल्ला कृषीतज्ञ देत आहेत.