Agro News | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषांपलीकडे जाऊन मदत करणार धनंजय मुंडेंचं वक्तव्य


Agro news | राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परभणीसह मराठवाड्यातील बीड, नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये पावसानं पिकांसह जमिनीचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ व एसडीआरएफ यांच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल, त्याचबरोबर नुकसानबादी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Agro News | खुशखबर! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेला ग्रीन सिग्नल

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील काष्टगाव, परभणी तालुक्यातील एकरुखा, मानवत तालुक्यातील कोल्हा, सेलू तालुक्यातील ढेंगळी पिपळगाव रेणापूर, बोरगव्हाण, खेरडा या ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पिकांची पाहणी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.परभणीतील काष्टगाव गावात नुकसानीची पाहणी करत असताना आज मुंडे यांना अतिवृष्टीमुळे वाळलेल्या कपाशीचे झाड देऊन स्वागत करण्यात आले. तसेच बाधित शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट इंडिया निकषानुसार मदत करावी. पिक विमा कंपनीला अग्रीम विमा रक्कम देण्यासाठी आदेशित करावे. अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

Agro News | कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकारची खेळी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

काय म्हणाले धनंजय मुंडे?

यावेळी कृषिमंत्री मुंडेंनी परभणी जिल्ह्यातील सर्व मंडलांतील शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा रक्कम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढावी. वीज नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलवर ऑनलाइन तक्रार करणे शक्य नाही, तेव्हा ऑफलाइन तक्रारी स्वीकारण्याचे आदेश काढण्याबाबत सूचना केल्या असून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या पाहणी वेळी आमदार राजेश विटेकर, आमदार मेघना बोर्डीकर इत्यादी उपस्थित होते.(Agro News)