Scholarship Scheme | सरकार देणार शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च!


Scholarship Scheme | भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात असतात. या प्रयत्नांतर्गत ओडिशा राज्यात कालिया शिष्यवृत्ती योजना चालवली जात असून या योजने अंतर्गत ओडिशातील शेतकरी कुटुंबांना अभ्यासासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

कालिया शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी यासाठी नोंदणी करू शकतात. नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारी ठेवण्यात आली असून अंतिम तारखेपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतात. मात्र, आता कालिया शिष्यवृत्ती योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्याच्या अंतर्गत तसेच बाहेरील खाजगी संस्थांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Scholarship Scheme | राज्याबाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ

ओडिशा राज्यातील कालिया शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दिलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आणि संबंधित विषय, नर्सिंग, डिप्लोमा आणि ITI मधील विविध ट्रेड यासारख्या व्यावसायिक तसेच तांत्रिक अभ्यासक्रमांना सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, राज्यातील तसेच बाहेरील मोठ्या संस्था जसे की IIT, NIT, AIIMS, IIM, ICAR, IARI, IISER, NISER, IVRI, CIFE आणि NDRI आणि इतर संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून विशेष म्हणजे यापूर्वी या योजनेचा लाभ राज्यातील फक्त सरकारी संस्थांमध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनाच मिळत होता आता मात्र तो खाजगी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Scholarship Scheme | शेतकरी कुटुंबातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

कालिया योजना 2021-22 मध्ये शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आली होती. तसेच या योजने अंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी आतापर्यंत एकूण 1789 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. कालिया शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट लहान आणि अत्यल्प शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना समाविष्ट करणे आहे.