Nashik : नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच बॅटिंग केली, त्यामुळे धरणं तुंबून भरली आहेत. सध्या काही काळ पावसाने विश्रांती घेतली असून हलक्या सरी अधून मधून हजेरी लावत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण धरणांत जवळपास 94.26% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागच्या वर्षी हा साठा 67.22% इतकाच होता परंतु यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांनी शंभरी गाठली आहे.
Weather Update | पावसाने घेतली विश्रांती; राज्यात आज पावसाच्या तुरळक सरी
नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले असून या धरणातून जायकवाडीला मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी देखील भरण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्ह्यात जवळजवळ 24 प्रकल्प असून सर्वच धरणे भरल्याचे चित्र आहे. तर गिरणा खोरे धरण समूहातील नागासारख्या मन्याड धरणे तळाशीच आहेत या धरणांचा पाणीसाठा सध्या चिंतेची बाब आहे.
काय आहे जिल्ह्यातील धरणाची एकूण स्थिती
गंगापूर धरण 94.49 % भरले असून कश्यपी धरण 96.87% गौतमी गोदावरी 91.76 %, पालखेड धरण समूहातील पालखेड धरण 87.75%, आळंदी धरण 100%, करंजवण धरण 99.27% तर वाघाड धरण 100% भरले आहे. ओझरखेड धरण 100%, पुणे गाव धरण 91.65%, तिसगाव धरण 100%, दारणा धरण 95% तर भावली धरण 100% भरले आहे. मोकणे धरण 87.25%, तर वालदेव विधरण 100%, कडवा धरण 86.20%, नांदूर मधमेश्वर धरण 100 टक्के भरले आहे. भोजापुर धरण 99.17%, चणकापूर धरण 90.23% तर हरणबारी, केळझर धरण 100% भरले आहे. गिरणा धरण 96.8%, पुनद धरण 81.65%, माणिकपुंज 99.76% भरले आहे. पहायला गेल्यास जिल्ह्यातील धरणामध्ये सध्या 94.26% इतका साठा झाला आहे.
Weather Update | राज्यात पुढील 72 तासात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका?
तर या धरणांतून केला जातोय विसर्ग
पालखेड धरणातून 1696 क्युसेक, करंजवळ 903 क्युसेक, गंगापूर धरणातून 1105 क्युसेक, पुणे गाव मधून 1300 क्युसेक, दारणा धरण 2071, क्युसेक कडवा धरण 3292 क्युसेक, नंदुर मधमेश्वर धरण 3962 क्युसिक, गिरणा धरण 4884 क्युसेकने विसर्ग सुरू असून इतर धरणातून थोड्या थोड्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. (Nashik)