Farmers Loan | शेतकऱ्यांनो कर्ज हवंय? ‘या’ योजनेच्या माध्यमातून घ्या लाभ


Farmers Loan | देशासह राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. शेतकरीहितासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आमलात आणलेल्या आहेत. यातच, देशातील शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दोन ते चार टक्के व्याजदराने मिळत आहे.

शेतकरी हा अनेक संकंटांचा सामना करत असतो जसे की, आस्मानी संकट, वातावरणातील बदल, अवकाळी, गारपीट आदी समस्या दरवर्षी शेतकऱ्यांना भेडसावत असातात. यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असते. दरम्यान, शेतकऱ्यांना सावकारांकडून जास्त व्याजदरानं कर्ज घेऊन शेती करावी लागू नये म्हणून, भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुरू केले. आता शेतकऱ्यांना गरज भासल्यास शेतकरी या कार्डवरुन कर्ज घेऊ शकतात.

Farmers Loan | फेब्रुवारी 2020 पासून 4.5 कोटींहून अधिकचे अर्ज मंजूर

केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची मोहीम राबवत असून ज्या अंतर्गत फेब्रुवारी 2020 पासून 4.5 कोटींहून अधिकचे अर्ज मंजूर करण्यात आलेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी सुलभ कर्ज मिळण्यासाठी घरोघरी धावण्याची गरज नसून किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना ही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी भारतातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी ऑगस्ट 1998 मध्ये सुरू केलेली एक क्रेडिट योजना आहे.

किसान क्रेडीट कार्ड या योजनेत शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजावर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. तर या योजनेत शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा पशुसंवर्धनाशी संबंधित लोकांनाही समाविष्ट करण्यात आले असून या अंतर्गत त्यांना फक्त 2 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. या योजने अंतर्गत 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेची अधिक माहीती मिळवण्यासाठी पुढील लिंक ‘किसान क्रेडिट कार्ड (KCC)‘ वर क्लिक करून माहीती घ्या.