Onion Price | कांदा उत्पादकांसाठी आनंदवार्ता; कांद्याचे भाव वाढले


Onion Price | ३ मे रोजी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीत हटवली. मात्र, त्यानंतर केवळ एकच दिवस कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झाली. मात्र, निर्यातदारांचे कांद्याचे भरलेले ४०० कंटेनर बंदरांवर अडकल्याचे वृत्त पासरताच दुसऱ्याच दिवशी कांद्याचे भाव पुन्हा कोसळले. 

दरम्यान, हा आठवडा कांदा उत्पादकांना काहीसा सुखावणारा ठरला. कारण आज कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे. साक्री तालुक्यातील दहिवेल व पिंपळनेर येथील उपबाजार समितीत आज कांद्याला १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.तर, मागील आठवड्यात हेच दर सरासरी प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये असे होते. मात्र, भाव वाढल्याने शेतकऱ्यांनीही साठवून ठेवलेला कांदा बाजारात आणायला सुरुवात केली असून, कांद्याची आवक वाढली आहे.

ऐन लाल कांद्याच्या मौसमात सरकारने निर्यातबंदी लादल्यामुळे लाल कांद्याकहा आउत्पादण खर्चही निघणे कठीण झाले होते. दरम्यान, आता निवडणुकांमुळे का असेना पण कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली असून, त्यामुळे निदान उन्हाळ कांद्याला तरी बरा दर मिळत आहे. (Onion Price)

Onion News | निर्यात शुल्काबाबत अस्पष्टता; सरकारच्या गोंधळामुळं कांदा बंदरावर सडतोय..?

Onion Price | कांद्याच्या दरांत इतकी वाढ

दरम्यान, आता कांद्याला आधीच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. कांद्यावरील निर्यात खुली झाल्याने प्रति क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी दरवाढ झाली आहेत. निर्यातबंदी उठल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून आर्थिक तंगीत असलेले कांदा उत्पादक शेतकरी सुखावले असून, कांद्याचे भावही वाढताना दिसत आहेत. तर, दर वाढ होण्याच्या आशेने साठवून ठेवलेले कांदेही आता शेतकऱ्यांनी बाहेर काढायला सुरुवात केली असूल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. 

 Onion Price | निर्यात खुली झाली मात्र कांद्याचे दर ‘जैसे थे’; कुठे कसे आहेत कांद्याचे दर..?  

असे आहेत कांद्याचे दर

दरम्यान, आज पिंपळनेर खासगी बाजार समितीत कांद्याला १८०० रुपये प्रतिक्विंटल तर, सरासरी १५०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. आता कांद्याच्या दरांत सुधारणा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवेलेला कांदा बाजारात आणायला सुरुवात केली असून, यामुळे आता कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. दहिवेल कांदा बाजारात १४५ हून अधिक वाहनातून कांद्याची आवक झाली. मात्र, खाजगी व उपबाजार समितीत कांद्याच्या भावात काही प्रमाणात तफावत असल्याचे दिसून येत आहे.(Onion Price)