Onion Price | निर्यात खुली झाली मात्र कांद्याचे दर ‘जैसे थे’; कुठे कसे आहेत कांद्याचे दर..?  


Onion Price |  नुकतंच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लादला. यंदा कांद्याचे उत्पादन कमी असल्याने पुढे  कांद्याचा तुटवडा भासू शकतो आणि कांद्याचे भाव वाढू शकतात. हे कारण पुढे करत कांद्यावर सरकारने निर्यात बंदी केली होती. मात्र, आता निवडणूक काळात कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना कांद्याच्या मुद्द्यामुळे होत असलेला विरोध लक्षात घेता. आता ऐन निवडणुकीच्या काळात कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली आहे. 

दारम्यान, सरकारच्या या धोरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. यानंतर आता ३ मे रोजी कांदा निर्यात बंदी (onion export) हटवली असून, आता निर्यात खुली होऊन ४ दिवस उलटले. मात्र, यामुळे केवळ कांद्याची बाजारपेठांमधील आवक वाढली आहे. याचा कुठलाही परिणाम कांद्याच्या भावात झालेला नाही. कांद्याच्या दरात काहीही वाढ झालेली नाही.(Onion Price)

Onion Price | कांद्याला कुठे १ रुपया आणि १५ रुपये प्रति किलो दर

Onion Price | असे आहेत कांद्याचे दर..?  

समोर आलेल्या माहितीनुसार, आज संगमनेरमध्ये प्रति किलो कांद्याला २ ते ३ रुपये, येवल्यात प्रति किलो कांद्याला ३  रुपये मनमाडमध्ये तब्बल ३५ दिवसानंतर लिलाव सुरू झाले असून, येथे प्रतिकिलो कांद्याला ४ रुपयांचा दर मिळाला. 

 नागपूर – प्रति क्विंटल किमान १००० रुपये, कमाल १,५०० रुपये, सरासरी १,३२५ रुपये

अकोला – प्रति क्विंटल किमान ८०० रुपये, कमाल १,५०० रुपये, सरासरी दर हा १,२०० रुपये

चंद्रपूर – प्रति क्विंटल किमान १,३०० रुपये, कमाल २,००० रुपये, सरासरी १,६०० रुपये असे दर मिळत आहे. 

Onion Price | निर्यात बंदी हटवल्यानंतरही कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारची योजना..?

निर्यात खुली होऊनही दर का वाढत नाही?

कांदा निर्यात बंदी असल्यामुळे कांद्याचे भाव (Onion Price) पडलेले आहेत, असा समज होता. मात्र, अता निर्यात बंदी (onion export) हटवूनही कांद्याचे दर का वाढत नाही..? असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली मात्र, निर्यातीवर प्रति टन ५५० डॉलर इतका भारदस्त निर्यात मूल्य देखील लादले आहे. तर ४० टक्के हे निर्यात शुल्कच आहे. त्यामुळं निर्यातबंदी (onion export) हटवली असूनही कांदा निर्यात होण्याची शक्यता आणि प्रमाण हे कमीच आहे. त्यामुळे कांद्याचे भाव न वाढण्याचे कारण हे किमान निर्यात मूल्य व निर्यात शुल्क आणि सरकारचे धोरण हेच आहे.