Unseasonal Rain | गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यात शहरासह नाशिक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसासह काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे बागांचे आणि चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यांचेही मोठे नुकसान झाले असून, पुन्हा एकदा अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (Unseasonal Rain)
Unseasonal Rain | कुठे शेड जमीनदोस्त, तर, कुठे कांदे वाहून गेले
दरम्यान, या अवकाळीच्या तडाख्यामुळे देवळा खर्डे रोडवरील शेतकरी प्रकाश आहेर यांचा डाळींब बागही उद्धवस्त झाला असून, यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच याच परिसरातील तब्बल चार ते पाच कांदा शेड जमीनदोस्त झाले आहेत. तर, कांदा व्यापारी भूषण ठुबे यांचे साठवलेले कांदे वाहून गेले असून, यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, काही ठिकाणी विद्युत खांब पडल्याने काल रात्रभर देवळा शहर अंधारात होते.
Unseasonal Rain | राज्यात गारपीटीसह तूफान पाऊस; उभे पीक डोळ्यांसमोर वाहून गेले..!
निसर्गाच्या लाहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका
गेल्या हंगामातही गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतात काढणीला आलेले कांदे वाहून गेले आणि द्राक्ष बागाही जमीनदोस्त झाल्या होत्या. तेव्हाही शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. तर, आता पुन्हा निसर्गाच्या लाहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून, यामुळे देवळाच नाहीतर, नाशिकच्या अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतमालांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांणी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले दिले असून, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत. परिस्थितीचा आढावा घेतला आहे. (Unseasonal Rain)
Onion Market | सरकार करणाऱ्या कांद्याची खरेदी; नाशिकमध्ये उभारणार खरेदी केंद्र