Maharashtra Rain | मागील अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने खर माजवला आहे. विदर्भासह अनेक भागांत पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाच आता या पावसाने उत्तर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला असून, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही भागांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) व गारपिटीने जोडपले असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.(Maharashtra Rain)
फळबागांचे तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, यात इगतपुरीसह ग्रामीण भागात घरांचे, साठवलेल्या कांद्यांचे नुकसान झाले आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी गावात तर वादळी वारा आणि गारपिटीमुळे १०० पेक्षा जास्त पोपट मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, यातच आता पुन्हा नाशिक, ठाणे व पालघर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा (Rain) इशारा हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
Rain Alert | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; वादळी वारा आणि गरपीटीचा इशारा
तसेच पुढील ३ ते ४ तास हे वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी प्रति तास असेल. तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागांतही येत्या ३-४ तासात अवकाळी बरसण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस असू शकतो.
Maharashtra Rain | सिन्नरमध्ये मोठं नुकसान
दरम्यान, नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील सिन्नर शहर आणि डुबेरे, मनेगाव, तालुक्याच्या पुर्व भागातील पांगरी, वावी, शहा, पंचाळे या गावांतही विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊ झाला. नांदुरशिंगोटे, दोडी, दापुर परिसरातही काही भागात माध्यम स्वरूओत पाऊ झाला. मात्र, सरदवाडी, पास्ते, जामगाव या गावांत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, आताही वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्यास सरदवाडी, पास्ते या परिसरात शेतकऱ्यांच्या बागांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
Unseasonal Rain | राज्यात गारपीटीसह तूफान पाऊस; उभे पीक डोळ्यांसमोर वाहून गेले..!
नांदगावात गारपिटीमुळे १०० पोपट मृत्यूमुखी
शनिवारी नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे १०० हून अधिक पोपटांचा मृत्यू झाला तर ३० हून जास्त पोपट गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व पोपटांचे वास्तव्य हे पोखरी येथील एका पिंपळाच्या झाडावर असल्यामुळे येथे नेहमीच पोपटांचा मोठा किलबिलाट असायचा. मात्र आता यांचा किलबिलाट शांत झाला आहे.