Onion Export | कांदा निर्यात पुर्ववत करा! भारत सरकारला ‘या’ देशांकडून विनंती…


Onion Export | सध्या नाशिक शहरासह राज्यभर कांदा निर्यातबंदी हटविण्याच्या मागणीवरून कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने 7 डिसेंबरपासून कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि त्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण हेण्यास सुरुवात झाली. 6 डिसेंबर रोजी कांद्याचा सरासरी घाऊक भाव प्रतिक्विंटल 3900 रुपये इतका नोंदवला गेलाअसताना आता गेल्या 15 दिवसांत हे दर जवळपास 50 टक्क्यांनी घसरलेले आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम भारतासह शेजारील देशांवर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णयाने नेपाळसह शेजारील देशांमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली तसेच नेपाळ हा देश अन्नधान्यासहीत कांदा आणि इतर भाजीपाल्यासाठी पूर्णतः भारत देशावर अवलंबून असल्याने भारतातील कांदा निर्यातबंदीचे परिणाम भारतासह नेपाळ द्शालाही भोगावे लागत असल्याचं चित्र आहे.

Onion Export | निर्यातबंदीचा मोठा परिणाम कांद्याच्या दरावर..

देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणजे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती होय. याच बाजारसमितीत केंद्र सरकारने 7 डिसेंबरपासू घातलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याच्या सरासरी दरात घसरण झाली असून येत्या काही दिवसात कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि त्यानंतर बाजारात कांद्याचे भाव जवळपास 50 टक्क्यांनी घसरलेत. खरीप कांद्याचा पुरवठा वाढला असल्याने येत्या आठवडाभरात कांद्याचे दर स्थिर राहण्याची किंवा किंचित कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे.

नेपाळ सरकारकडून अधिकृतरीत्या भारत सरकारला विनंती

कांदा निर्यातबंदीचा परिणाम आता भारतासह इतर देशांना होताना दिसत असून याच प्रामुख्याने नेपाळचा समावेश आहे. दरम्यान, यातच नेपाळ सरकारने भारत सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर चीन देशातून कांदा मागवला मात्र, हा कांदा चवीला चांगला नसल्याने नेपाळकडून त्याची आयात थांबवण्यात आली. आता भारताकडे कांदा निर्यात पूर्वीप्रमाणे करण्याकरिता नेपाळ सरकारकडून विनंती केली जाणार असून नेपाळ सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडून अधिकृतरीत्या भारत सरकारला ही विनंती करण्याबाबत स्थानिक वृत्तपत्रात म्हटलेले आहे.

इकडे भारत सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मागील आठवडयामध्ये नेपाळ देशात एक किलो कांद्यासाठी ग्राहकांना २०० रुपये मोजावे लागत होते मात्र, नेपाळ सरकारने आपला राखीव कांदा साठा सामान्य बाजारात खुला केल्याने कांद्याचे दर आता १६० रुपये प्रति किलोपर्यंत उतरले आहे.