Cold Update | थंडीचा जलवा! निफाड तालुक्यात तापमान 9 अंशापर्यंत घसरलं


Cold Update | यंदा राज्यात अत्यल्प झालेल्या पावसामुळे राज्यात यंदा थंडीही दडी मारून बसते काय असा अंदाज असताना राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा पारा चांगलाच घसरतो आहे. यातच राज्यातील काही भागात थंडीने चांगलाच डलवा दाखवायला सुरूवात केला असून विदर्भ, मराठवाड्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढ आहे. तर आता मुबंईसह उपनगरांमध्येही तापमान घसरताना दिसत असून शहरातील पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.

यातच, राज्यच्या अनेक भागात तापमानात घसरण होत असून नाताळाच्या सलग सुट्ट्या आल्या असल्याने पर्यटकांसाठी हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. दरम्यान, रविवारी महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हटल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान 15 अंशापर्यंत घसरलं तर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील तापमान हे 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे.

अचानक राज्यातील तापमान कमी होण्यामागे कारण काय?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अचानक थंडी जाणवण्यास सुरूवात झाली असून यामागील कारण म्हणजे अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे अचानक थंडीचा जोर वाढला आहे. सध्या उत्तरेकडे गार वारे वाहणं सुरु असून त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने सुरु झाला असून या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढतो आहे. यातच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानात चांगलीच घसरण होत आहे. तर पुढील 5 दिवस तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने चढउतार होत राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Cold Update | रब्बी पिकांसाठी ही थंडी फार फायदेशीर

राज्यासह देशात येत्या काही दिवसात तापमानाचा पारा घसरणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असून ही थंडीची लाट या वर्षअखेरपर्यंत कायम राहू शकणार आहे. असं असताना शेतकऱ्यांसाठी मात्र ही चागंली बाब असून रब्बी पिकांसाठी ही थंडी फार फायदेशीर ठरणार आहे.