Sucess Story | दुग्ध व्यवसायाच्या सूक्ष्म नियोजनातून बक्कळ नफा


Sucess Story |  राज्यात शेतकरी हे शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन हे मोठ्या प्रमाणावर करत असतात. मात्र शेतीतील शेतपीकांसारखे दुधाचेही दरांमध्ये आता चढउतार होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे आता दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत. मात्र, डोंगरगाव (ता.अकोले) येथील दुग्ध व्यावसायिक हरिभाऊ उगले यांनी ह्याच दुग्ध व्यवसायाला नविण्याची जोड देत ह्या व्यवसायात मोठी प्रगती करत एक नवा आदर्श ठेवला आहे. या व्यवसायातून ते दर महिन्याला तब्बल सव्वा लाख रुपये इतका नफा मिळवतात.(Sucess Story)

हरिभाऊ उगले आणि त्यांचे कुटुंबीय हे गेल्या ३९ वर्षांपासून हा व्यवसाय करतात. दरम्यान, ह्या व्यवसायाला अधिक लाभदायक करण्यासाठी त्यांनी अनेक दुग्ध व्यावसायिकांची भेट घेत. या व्यवसायाशी संबंधित सक्षम आणि कमकुवत बाजूंचा अभ्यास करत ह्या व्यवसायात उत्तुंग यश संपादन केले आहे. सध्या हरिभाऊ उगले यांचा मुलगा माधव उगले आणि सून स्वाती उगले हे हा व्यवसाय त्याच जोमाने पुढे नेत असून, नव्या पिढीने उगले कुटुंबियांच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकता आणि नाविन्यतेची जोड देत उत्तुंग कामगिरी केली आहे. तब्बल २५ गुंठे इतक्या क्षेत्रावर त्यांनी मुक्त गोठा तयार केलेला आहे. सद्यस्थितीला त्यांच्याकडे एचएफ जातीच्या जर्सी १९ व ९ कालवडी अशा एकूण २८ गाई असून, हा गोठा आधुनिक यंत्रांनी सज्ज केलेला आहे.(Sucess Story)

ह्या गायींना दिवसातून फक्त एकदाच चारा घातला जातो तर, दोनदा पशुखाद्य घातले जाते. ह्या गोठ्यात गायींना पिण्याच्या पाण्यासाठी खास यंत्रांचा अवलंब केलेला आहे. ह्या यंत्राद्वारे गोठ्यात थेट पाण्याच्या टाकीतून पाणी हे गायींच्या पाणी पिण्याच्या भांड्यात सोडण्याची व्यवस्था केलेली आहे. जसजसे भांड्यातील पाणी संपते तसे त्यात पाणी हे गरजेनुसार येते. यासोबतच गायींचे दूध काढण्यासाठीही याठिकाणी मिल्किंग मशिनचा वापर केला जातो. यामुळे दूध हे शुद्धता राखली जाते.(Sucess Story

उगले कुटुंबीय हे त्यांच्या जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. यासाठीही त्यांनी काही आधुनिक तंत्रांशी सांगड घालत त्यांच्या गळ्यात जिओ कंपनीचे प्रायोगिक तत्वावर ‌‘गो समृद्धी’ हे टॅग लावलेले असून, ह्या टॅगमुळे गाई आजारी पडणे, हिटवर येणे यांसह इतर बाबी ह्या मोबाइल ॲपद्वारे तत्काळ संदेश प्राप्त होवून कळतात. चारा खाताना अनेकदा गायींच्या पोटात लोखंड जाते. त्यामुळे त्या आजारी पडतात किंवा यामुळे गाई दगावण्याचीही शक्यता असते. यावर उपाय म्हणून गायींच्या पोटात ‘काऊ मॅग्नेट’ सोडून यावरही नियंत्रण मिळवले आहे.

उगले कुटुंबियांचा हा व्यवसाय फक्त दुधावरच थांबलेला नसून, त्यांनी सूक्ष्म नियोजन करत ह्या व्यवसायातून इतरही सक्षम उत्पन्नाची साधने तयार केली आहेत. त्यांनी सगळ्या दुधाची विक्री न करता ह्या दुधापासून तूप, खवा, पनीर, पेढे, मोदक असे दुग्धजन्य खाद्य पदार्थ तयार करत भरगोस नफा मिळवला आहे. दरम्यान, ते दर महिन्याला तब्बल पाचशे ते सहाशे लिटर घरगुती तुपाची विक्री करुन साठ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवतात.

एवढेच नाहीतर, रोज तब्बल दोनशे लिटर दूध काढून त्यातूनही ते दर महिन्याला साठ हजार रुपये मिळवत आहे. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांवरच न थांबता त्यांनी शेणखताचीही विक्री करता त्यातूनही ते वर्षाला तब्बल एक लाख रुपयांची कमाई करतात. अशा प्रकारे आधुनिकता आणि पारंपारिकता यांची सांगड घालत दर महिन्याला ते जवळपास एकूण सव्वा लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत. दरम्यान, ह्या व्यवसायात उत्तुंग कामगिरी करता उगले कुटुंबीयांनी शेतकऱ्यांसामोर एक आदर्श ठेवला आहे. (Sucess Story)


खरंतर शेतकरी हे व्यवसायाकडे डोळसपणे पाहतच नाहीत. आम्ही ह्या दुग्ध व्यवसायाचे सूक्ष्म नियोजन करुन फक्त दुधावर अवलंबून न राहता यातूनच उत्पन्नाची इतर सक्षम माध्यमेही शोधली आहेत. त्यामुळेच आज दुग्धजन्य खाद्य पदार्थांच्या विक्रीतून आम्ही चांगली कमाई करीत आहोत. यासोबतच मुक्त गोठा ह्या आणि इतरही आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्याने इतर वर खर्चाचीही बचत झाली आहे.
– माधव उगले (दूध उत्पादक)