Lasalgaon | लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद…


Lasalgaon |   गेल्या अनेक दिवसांपासून कांदा प्रश्न नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात पेटत असून, आज पुन्हा नाशिकच्या लासलगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीतील कांदा लिलाव हे बंद पाडले आहेत. ह्या वर्षाच्या सुरुवातीला आधी पावसाने दडी मारली त्यानंतर कसंबसं जेमतेम पाण्यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा आणि द्राक्ष हे पिकं उभे केलेत.

तर, त्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बळीराज्याच्या तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. दरम्यान, यानंतरही ह्या महिन्यात ७ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली. आणि त्यामुळे केंद्राच्या ह्या निर्णयाचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव हे बंद ठेवले होते.

दरम्यान, यातूनही कसातरी मार्ग काढत आता  कुठे कांदा लिलाव हे सुरू झालेत, तर, त्यातही त्या कांद्याचा भाव हा अर्ध्याहूनही खाली आला. दरम्यान, ह्या सर्व प्रकारामुळे आता संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव हे बंद पाडण्यात आले आहे. 

दरम्यान, कांदा निर्यात बंदीच्या आधी ज्या कांद्याला तीन ते चार हजारांच्या घरात भाव मिळत होता. त्यानंतर मात्र दरांमध्ये सारखीच घरसण होत गेली आणि आता त्याच कांद्याचा भाव आता खाली उतरले असून, आज लासलगाव बाजार समितीमध्ये सुरुवातीला कमीत कमी ८००, जास्तीत जास्त २३०० आणि सरासरी २१०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभव मिळावा तसेच कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने उठवण्यात यावी. यासाठी आज येथील संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले आहेत. 

दरम्यान, केंद्राने केलेल्या निर्यात बंदिवरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लात उसळली असून, कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले आहेत. दरम्यान, कांदा पिकाला चांगला हमीभाव मिळावा अशी ह्या संतप्त शेतकऱ्यांची मागणी असून, ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.