Onion Export Ban | देशातील कांदा निर्यातबंदी ठरतेय पाकिस्तानसाठी मोठी संधी…!


Onion Export Ban | ७ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि या निर्णयाविरोधात देशातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. यातच, भारताने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर पाकिस्तान देशात या मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे जगातील अनेक मोठ्या कांदा खरेदीदारांमध्ये नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे.

कांदा निर्यात बंदीनंतर देशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र निषेध वर्तवला. दरम्यान, भारतातील कांदा निर्यातबंदीमुळे पाकिस्तानला या निर्णयाचा फायदा होताना दिसत आहे. कांद्याबाबत पाकिस्तानचा नवा निर्णय भारताकडून परंपरेने कांदा खरेदी करणाऱ्या देशांच्या मजबुरीचा फायदा घेणार असून आपल्या देशात कांद्याच्या वाढत्या किमतीच्या नावाखाली, पाकिस्तानकडून कांद्याची किमान निर्यात किंमत (MEP) कमी करून US$ 1200 प्रति टन करण्यात आली आहे.

Onion Export Ban | कांद्याची निर्यात थांबवण्याऐवजी अटींसह सुरू करावी

भारतातील कांदा निर्यातबंदीचा पाकिस्तानला दुहेरी फायदा होत असून एकीकडे ते भरपूर पैसे कमवत आहेत तर दुसरीकडे भारतीय कांद्याची बाजारपेठ काबीज करतानाचे चित्र आहे. गेल्या सात महिन्यांपासून भारताने कांद्याबाबत घेतलेल्या निर्णयांचा थेट फायदा पाकिस्तानला होत असल्याचे नाशिकचे मोठे कांदा निर्यातदार सांगत आहेत. त्यामुळेच कांद्याची निर्यात थांबवण्याऐवजी अटींसह सुरू करावी, असे राज्यातील अनेक उत्पादक निर्यातदार संघटनेचे म्हणणे आहे.

कांदा निर्यातबंदीमुळे संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त होत असून, त्यामुळे कांद्यावर निर्यात बंदी घातल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे. निर्यातीवर कधीही बंदी घालू नये, तर अटी लावल्या गेल्या पाहिजेत. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद होणार नाही. आता निदान पाकिस्तानकडून तरी शिकता यायला हवं. निर्बंध लादण्याऐवजी अटी घालून निर्यात केली असती तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला नसता. सध्या कांद्याचा भाव 15 रुपये किलो आहे. सरकारला आमच्याकडून ५ रुपये किलोने कांदा हवा आहे का? – भारत दिघोळे (महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष)