Agro News | पीकांवर ‘पावडरी मिलड्यूक’ रोगाचे थैमान; कशी घ्याल काळजी


Agro News | सध्या वातावरणात अनेक बदल होत असून, या वतावरणीय बदलामुळे भाजीपाल्याच्या पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगामुळे पिकांची पानगळ होत असून, पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता भाजीपाला उत्पादक शेतकरी हे मोठ्या संकटात सापडले आहेत. या हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र, या रोगामुळे आता पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

रात्री उच्च सापेक्ष आर्द्रता आणि दिवसा कमी सापेक्ष आर्द्रता तसेच २२ ते ३० डिग्री सेल्सिअस असे तापमान असल्यामुळे या रोगाचा प्रसार वाढला आहे. या रोगामुळे झाडांची पानगळ होते. झाडांची सगळी पाने गळून पडतात. झाडे सुकतात. त्यामुळे पीक जागीच खराब होत आहे. यावर शेतकरी औषधांची फवारणी करत आहेत. झाडाच्या शेंड्यापर्यंत पाने गळतात आणि खाली फक्त खोडच शिल्लक राहते. तसेच यामुळे झाडे सुकतात. (Agro News)

Agro Special | ‘शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण’; राज्यातील राजकारणावर शेतकरी आक्रमक

रोगाची लक्षणे काय..?

या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या पानांवर पिवळसर डाग पडतात. तसेच या रोगानंतर पानाच्या खालच्या बाजूसही पांढरी बुरशी वाढून ही बुरशी पानाच्या पृष्ठभागावर पसरल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा होऊन पाने आणि फुले गळतात. शेतकऱ्यांनी लाखोंची गुंतवणूक करून पीकए उभी केलीत. मात्र, या भुरी रोगाच्या प्रसारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.(Agro News)

Agriculture News | ऊस टंचाईमुळे राज्यभरात ऊसाची वाहतूक न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Agro News | काय सावधगिरी बाळगावी…

पीकावर या रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर ‘सल्फर’ ८०%, ‘डब्ल्यू.पी’ २५ ग्रॅम किंवा ‘अझोक्सा ट्रोबिन’ २३ एस. सी. १० मिली संयुक्त बुरशीनाशके जसे की, ‘अॅझओक्सास्ट्रोबिन’ ११ % जास्त ‘टेबूकोनाझोटल’ १८.३ % एस. बी १० मिली किंवा ‘टेब्यूकोनाझोल’ १८.३ % जास्त सल्फर ६५ % ‘डब्ल्यूजी’ २५ ग्रॅम यांची प्रति १० लिटर पाण्यात घेऊन पिकांवर फवारणी करण्याचा सल्ला एका पीक संरक्षण तज्ञांनी दिला आहे.(Agro News)

(टीप – वरील बाबी ‘एग्रोटेक’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही.)