Onion Export Ban | निर्यात बंदी हटवल्याने विरोधक नाराज; काय म्हणाल्या भारती पवार..?


Onion Export Ban | गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादकांच्या माथी असलेली निर्यात बंदीची साडेसाती आता अखेर संपली असून, निवडणुकांमुळे का होईनात पण आज केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली आहे. यामुळे ज्यांना सर्वात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्या दिंडोरी लोकसभेच्या विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Onion Export Ban)

“आम्ही सर्वांनी कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याची मागणी केली होती. काहीही करा पण कांदा निर्यात खुली करा अशी मागणी आपण केली होती. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याला चांगला दर मिळेल. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय आहे.

तसेच “डीजीएफटीच्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता असून, कांद्याचे किमान निर्यात मूल्य हे ५५० डॉलर प्रति टन इतके असणार आहे. पर मेट्रिक टनामुळे आता कोणीही कसलाही संभ्रम बाळगू नये, कांद्याची निर्यात पूर्णपणे खुली करण्यात आली आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांचे आभार मानते”, असे भारती पवार म्हणाल्या. (Onion Export Ban)

Onion Export Ban | कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या नेत्यांनो आता मतं मागायला येऊ नका

Onion Export Ban | ५ वर्षापासून मी कांद्यावर काम करतेय

मागील ५ वर्षापासून मी कांद्याच्या विषयावर काम करतेय. कांद्याला १५०० ते २००० इतका हमीभाव मिळावा हे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पीकाची आवक वाढल्यामुले असे निर्णय घेतले जातात. आताही आवक वाढल्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. आता MEP लावल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि शेतकऱ्यांकडून चांगल्या दराने शेतमाल घेतला जाईल, असंही भारती पवारांनी यावेळी सांगितले.

या निर्णयामुळे विरोधक नाराज झाले

दरम्यान, कांद्यावरील निर्यात बंदी हटवली मात्र, निर्यात शुल्कात वाढ करण्यात आल्याच्या मुद्यावरुन शेतकरी संघटना संतत्प झाल्या आहेत. एकीकडे निर्यातबंदी हटवली पण दुसरीकडे निर्यातशुल्क लागू केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारन एक प्रकारे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचे आरोप शेतकरी संघटनांनी केले आहेत.

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका

याबाबत भारती पवार म्हटल्या की, “कांद्याचे दर वाढले असून, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार आहेत. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निर्यातशुल्क नाही तर MEP टाकलेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक हे नाराज झाले असतील आणि दुःखी झाले असतील की कांदा निर्यात खुली झाली, असा मिश्किल टोलाही यावेळी भारती पवारांनी विरोधकांना लागावला.