Onion Market | सरकार करणाऱ्या कांद्याची खरेदी; नाशिकमध्ये उभारणार खरेदी केंद्र


Onion Market | गेल्या वर्षी ७ डिसेंबर पासून कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली होती. या विरोधात अनेक शेतकरी संघटनांनी आणि कांदा उत्पादकांनी आंदोलने केली. यानंतर आता अखेर निवडणूकीच्या काळात कांदा उत्पादक भागात सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना होणारा विरोध पाहता कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, असे असले तरीही कांदा निर्यातीवर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे. कांद्यावर ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन इतके किमान निर्यात लागू करण्यात आले आहे.(Onion Market)

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न

यामुळे कांद्याची निर्यात जरी होणार असली तरी शेतकऱ्यांना याचा फारकाही फायदा होणार नसून, ही केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. यातच आता एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून तब्बल पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी नाशिक, पुणे, गुजरात, हरियाणा या चार ठिकाणी खरेदी केंद्र तयार केले जाणार आहेत.

 Onion Export Ban | निर्यात बंदी हटवल्याने विरोधक नाराज; काय म्हणाल्या भारती पवार..?

ज्यावेळी शेतकऱ्यांकडे कांदा होता. त्यावेळी निर्यातबंदी होती आणि आता निर्यात बंदी हटवली आहे. मात्र, शेतकाऱ्यांकडे केवळ ३० टक्के कांदा शिल्लक आहे. यामुळे शेतकरी व निर्यातदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी NCEL च्या माध्यमातून काही मित्रदेशात मर्यादित प्रमाणात कांद्याची निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती.  (Onion Market)

 Onion Market | पाच लाख टन कांदा खरेदी करणार

एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथील पत्रकार परिषदेत सांगितले की,”कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर आता केंद्र सरकार एनसीसीएफ (NCCF) व नाफेडच्या माध्यमातून (NAFED) तब्बल पाच लाख टन इतका कांदा खरेदी करणार आहे.  याअंतर्गत पुढील जून महिन्यापर्यंत नाशिक, पुणे, हरियाणा व गुजरात येथे खरेदी केंद्राच्या माध्यमातून पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. कांदा खरेदीचे लक्ष्य ५  लाख मेट्रिक टन इतके असून, त्यात नाफेडसाठी २.५ तर एनसीसीएफसाठी २.५ मेट्रिक टन इतका कांदा खरेदी केला जाणार आहे.  

Onion Export | निर्यात बंदी हटवली पण मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लागू