Bajar Samiti | नाशिकमधील १५ बाजार समित्या आज बंद; का पुकारला संप


Bajar Samiti |  आज राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे. राज्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच  बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे ‘राष्ट्रीय दर्जा बाजार समिती’ बनविण्याचे २०१८ चे विधेयक मागे घ्यावे, या आणि अशा आणखी काही प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटनांकडून राज्यभरातील सर्व बाजार समित्यांमधील आज सोमवारी कडकडीत बंद पुकारण्यात आले आहे. 

राज्य सरकारने ‘कृषी उत्पन्न पणन अधिनियम’ या विधेयकात काही सुधारणा केल्याने बाजार समित्यांसह समितीतील सर्वच घटकांचे अस्तित्व हे संपुष्टात येऊ शकते. तसेच या बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्याची तयारी सुरू असल्याचे आरोप राज्यातील शेतकरी संघटनांनी केले आहेत. त्यामुळे याच्या निषेधार्थ आज राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. (Bajar Samiti)

Nashik | नांदगावमधील बाजार समितीत शेतकऱ्यांना शिवीगाळ

Bajar Samiti | नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

तर, शेतकरी संघटनांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आज नाशिक जिल्ह्यातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह इतर १५ बाजार समित्यांचे कामकाज बंद असून, रोज शेतकऱ्यांची वर्दळ असलेल्या या बाजार समितीत आज शुकशुकाट दिसत आहे. आजच्या या संपामुळे बाजार समित्यांमधील सर्व लिलाव बंद आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील १५ ते २० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. 

Nashik News | शेतकऱ्यांवरच रेशनचे गहू खाण्याची वेळ

पुण्यातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी

या बाजार समित्यांच्या काम बंद आंदोलनात पुणे येथील ‘श्री छत्रपती शिवाजी मार्केट’ यार्डमधील कामगार संघटना देखील सहभागी झाल्या आहेत. तर, आज सकाळपासून या यार्डमधील कामकाज बंद ठेवले असून, येथील शेतकऱ्यांनीही आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येऊ नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुण्यातील हे मार्केट यार्ड आज सकाळपासून बंद असल्याने याठिकाणीही शुकशुकाट आहे.

बाजार समित्यांचे म्हणणे काय..?

सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजारतळ, उपबाजारतळ निर्मिती, तसेच आडते, हमाल आणि मापारी इत्यादि घटकांच्या विरोधात राज्य सरकारने पणन कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यभरातील बाजार समित्या या बंद पाडून हमाल-मापारी, तथा शेतकऱ्यांचे देखील यामुळे नुकसान होऊ शकते, असे बाजार समित्यांचे म्हणणे आहे. आणि या मागण्यांमुळे आज बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. (Bajar Samiti)