Agriculture News | शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत मोठी घोषणा..?


Agriculture News |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी अनेक दिलासादायक योजना राबवत असून, यात आणखी एक मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. तर, योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ होणार आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे तब्बल ५ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय मानला जात आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाणार आहे. (Agriculture News)

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प आज सादर केला. असून, यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. तर, या अर्थसंकल्पात हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी ते म्हणाले की,” मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या वेदना कळत आहेत. त्यामुळे मी राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी ७,२७६.७७ कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. एवढंच नाहीतर, तर शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी एक्स-ग्रॅशिया रक्कम ही ५० लाखांवरुन १ कोटी करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये १८ नवीन सरकारी पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

Agriculture News | ऊस टंचाईमुळे राज्यभरात ऊसाची वाहतूक न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी उत्पादनात देशातील सर्वाधिक वाढ

हरियाणा राज्यातील कृषी उत्पादनात ८.१ टक्क्यांनी वाढ झाली असून, जी संपूर्ण देशातील सर्वाधिक वाढ मानली जात आहे. मागील ३ महिन्यांत सरकारने किमान आधारभूत किंमतीवर १४ पिकांची खरेदी केली आहे. तर, त्यातील पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पोहोचले आहेत. या खरीप हंगामात सरकारने २९,८७६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असून, रब्बी पीक हंगाम २०२३ मध्ये जमा केलेले आहे.

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रशिक्षण

दरम्यान, हरियाणा सरकारच्या एका उपक्रमाच्या अंतर्गत, सरकार ५०० नवीन तरुण शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देणार असल्याची प्रक्रिया सुरु झाली असून, हरियाणा सरकारने २०२३-२४ या वर्षात शेतकऱ्यांना ११,००७ इतके पीक अवशेष मशीनचे देखील वाटप केलेले आहे. तसेच या वर्षात शेतकऱ्यांना १३९ कोटी रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कमेचे वितरण करण्यात आले आहे.

Agriculture News | अमित शहांनी नॅनो युरिया-डीएपीबाबत केली मोठी घोषणा

२९७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई

यावर्षी आतापर्यंत हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून तब्बल २९७ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले आहे. तर, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहेत. उप-पृष्ठभाग आणि उभ्या ड्रेनेज तंत्राचा वापर करून ५२,६९५ एकर इतके क्षेत्र घेतल्याचे देखील यावेळी हरियाणा सरकारतर्फे सांगण्यात आले. तर, या कामासाठी सरकारने तब्बल ८० कोटींचा निधी खर्च केला आहे. (Agriculture News)