Chhagan Bhujbal | नाशिकमधील प्रत्येक तालुक्यात असे प्रदर्शन भरवले पाहिजे – मंत्री भुजबळ


Chhagan Bhujbal | मनमाड बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बळीराजा कृषि प्रदर्शनाचे आज उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित केले. अनिश्चित पर्जन्यमान, हवामान बदल व वाढती लोकसंख्या यांचा विचार करता अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल, शेतीपूरक व्यवसाय करतानाच शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. त्यासाठी शेतकऱ्यांना नक्कीच या बळीराजा कृषी प्रदर्शनाचा फायदा होईल. कारण या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच छताखाली विविध नवप्रयोगांची माहिती मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.(Chhagan Bhujbal)

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

आता सगळ्या गोष्टी मोबाईलवर सहज उपलब्ध होत असून, या माध्यमातून अद्ययावत कृषि तंत्रज्ञान आत्मसात करावे, केंद्र तथा राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. भूविकास बँकेकडचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. विविध योजनांचा आर्थिक लाभदेखील दिला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अनुदान हे सरकारच्या वतीने देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

Nashik | नांदगावमधील बाजार समितीत शेतकऱ्यांना शिवीगाळ

Chhagan Bhujbal | प्रत्येक तालुक्यात असे प्रदर्शन भरवले पाहिजे

मनमाडमधील कृषि प्रदर्शन हा अतिशय चांगला उपक्रम असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक बाजार समितीत कृषि प्रदर्शन भरवले पाहिजे. कारण प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन अवजारे, आधुनिक कल्पना येत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात नाशिकचे शेतकरी हे प्रयोगशील असून, बिन पाण्याची शेती, हळदीचे प्रयोग हे आपल्याकडे केले गेले आहेत. अशाच पद्धतीने मेहनत करून नवनवीन संकल्पना शेतकऱ्यांनी राबवाव्यात. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी शेतकरी बांधवांना केले.

Nashik News | शेतकऱ्यांवरच रेशनचे गहू खाण्याची वेळ

भाव मिळाला आणि त्यामुळे कांदा उत्पादन वाढले

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कांद्याला भाव मिळाला आणि त्यामुळे कांदा उत्पादन वाढले आहे. मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाल्यास शेतकऱ्यांना भाव मिळेल. मात्र, त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच, बाजार समितीतील हमाल मापारी, शेतकरी यांनाही सुविधा पुरवण्याचे निर्देष यावेळी त्यांनी दिले.

मनमाड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित बळिराजा कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, या या कार्यक्रमास माजी आमदार जगन्नाथ धात्रक, पंकज भुजबळ, गणेश धात्रक, माजी पणन संचालक सुनील पवार, विजय पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड, ॲड. गंगाधर बिडगर, राजेंद्र भोसले, बाजार समिती सभापती दीपक गोगड, दर्शन आहेर आदि उपस्थित होते.(Chhagan Bhujbal)