Nashik | नांदगावमधील बाजार समितीत शेतकऱ्यांना शिवीगाळ


Nashik | केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे आधीच कांद्याचे दर जमीनीला टेकल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच सधा कांद्याचा उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी निराश आहेत. त्यातच आता नशिक जिल्ह्यातील नंदगाव येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, येथील एका बाजार समितीत एक कांदा उत्पादक शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची बाब उघडकिस आली आहे.

Nashik | नेमकं प्रकरण काय..?

या प्रकरणी शिवीगाळ करण्यात आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नाव हे प्रवीण निकम (रा. ता. नांदगाव) असे असून, ह्या शेतकऱ्याने कृषि उत्पन्न उपबाजार समिती बोलठान येथे आपला कांदा विकला होता. दरम्यान, शेतकऱ्याने ज्या व्यापाऱ्याला कांदा विकला होता. त्याने शेतकऱ्याला १५ दिवसांनंतर पैसे घेण्यासाठी बोलावले. दरम्यान, हा शेतकरी १५ दिवसानंतर पैसे घेण्यासाठी गेला असता त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यास उदवाउडवीची उत्तरे दिली व धमकी दिली. तसेच अतिशय गलीच्छ भाषेत शिवीगाळ केली. (Nashik)

Nashik News | शेतकऱ्यांवरच रेशनचे गहू खाण्याची वेळ

दरम्यान, स्वतःच्याच पीकाचे पैसे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला शिवीगाळ करणारा व्यापारी हा दुसरा तिसरा कोणी नसुन त्याच कृषि उत्पन्न उपबाजार समीती बोलठान येथील सभापती अर्जुन पाटील यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे एकिकडे बाजार समिती प्रशासनाकडून असे सांगितले जाते कि, शेतकऱ्यांना रोख स्वरुपात आणि ताबडतोब पैसे दिले जातील आणि दुसरीकडे येथील सभापती महोदयांच्याच पावत्यांवर शेतकऱ्यांना १५ दिवसांनंतर पैसे दिले जातात.

त्यातही हक्काचे पैसे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना शिवीगाळ केली जाते आणि अरेरावीची भाषा केली जाते. येथील व्यापारी तसेच नांदगाव कृषि उत्पन्न बाजार समिती हे संगमताने शेतकऱ्यांची अडवणूक करतात शेतकऱ्यांना पैशांसाठी वेठिस धरतात आणि शिवीगाळ करतात. या व्यापारी वर्गाचा व कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचा कांदा उत्पादक संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.(Nashik)

Nashik News | नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’…

या प्रकरणी बाजार समितीचे सभापती यांनी पदाचा राजीनामा द्यावा. तसेच संबंधित व्यापाऱ्यांची कांदा खरेदी आणि एशरत्न या कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले असून, या मागण्यांची बाजार समिती प्रशासनाने अंमलबजावणी न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका युवा अध्यक्ष सोमनाथ मगर यांनी दिला आहे.(Nashik)