Nashik News | शेतकऱ्यांवरच रेशनचे गहू खाण्याची वेळ


Nashik News |  गेल्या वर्षात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिप हंगाम वाया गेला. मात्र, आता रब्बीची परिस्थिती ही त्याहूनही वाईट आहे. पालखेड येथील कालव्याच्या लाभक्षेत्रात थोड्याफार प्रमाणात रब्बी हंगाम फुलल्याचे दिसत आहे. मात्र, उत्तर पूर्व भागात तर, शेतजमीन नुसती ओसाड पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल साठ गावांवर टँकरने पुरवठा सुरू असल्याने गहू तर दिसेनासा झाला आहे. नेहमी बागायतदार म्हणवणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षी विकत आणि रेशनमधून गहू आणि तांदूळ खरेदी करून खाण्याची वेळ ओढवली आहे. तर, काही सर्वसामान्य कुटुंब हे रेशनचे आणि मार्केटमधूनही गहू खरेदी करत आहेत. तालुक्यातील शेती ही आठमाही असून, पाऊस आला तरच खरीप आणि रब्बी हंगाम हाती येतो. (Nashik News)

यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू लागली. उत्तर-पूर्व भागात विहिरींनी तळ गाठला आहे. दिवाळीनंतर होते ते पाणीही आटले. यंदा खरीपात मका, सोयाबीन, भुईमूग, आणि कपाशी यासह प्रमुख पिकांनीच निराशा केल्याने शेतकऱ्यांचे तब्बल ६० ते ७० टक्के इतके नुकसान झाले. दिवाळीत तरी निदान पाऊस पडेल आणि रब्बी हंगामात दिलासा मिळेल ही शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, याही अपेक्षांवर पाणी फेरले.

Nashik News | नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’…

Nashik News | गहू फक्त नाममात्र…

हा सरकारने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असून, या तालुक्यात गव्हाचे उत्पादन हे तब्बल सहा ते सात हजार हेक्टरच्या इतके होते. मात्र, यंदा फक्त तीन हजार १४९ हेक्टरवर इतकीच पेरणी झाली आहे. उत्तर पूर्व भागात फक्त नावाला गहू पिकला आहे. शासकीय नोंदीत या तालुक्याच्या १२४ पैकी ५२ गावे ही रब्बीची आहेत. पावसाने निराशा केल्याने आज या भागातील अनेक गावांत प्यायलाही पाणी नाही. तर, अशा परीस्थितीत रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हाती लागलेला नाही. पालखेड डाव्या कालव्याला केवळ महिनाभराचे एकच आवर्तन मिळाले होते. त्यानुसार, उपलब्ध पाण्यावर कांद्याची लागवड करण्यात आल्याने गव्हाच्या पीकांच प्रमाण हे क्षुल्लक आहे.(Nashik News)

Nashik Weather | आज ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता

Nashik News | रब्बी क्षेत्र घटले

पश्चिम भागात असलेल्या जेमतेम पाण्यावर, तर उत्तरपूर्व भागातही असलेल्या थोड्याफार पाण्यावर येथील शेतकऱ्यांनी कांद्याला प्राधान्य दिले असून, कांदा जगविण्यासाठीचे त्यांच प्रयत्न आहेत. काही शेतकऱ्यांनी तर या हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड केली असून, त्यासाठी ते शेततळ्याचे पाणी वापरत आहेत. तर, ज्यांच्याकडे पाणी नाही अशा शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्यामुळे या हंगामात सर्वाधिक क्षेत्रात हरभरा हे पीक असून, यंदा तब्बल चार हजार १३६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आलेली आहे. तर, २ हजार ७८८ हेक्टरवर मकाची पेरणी झाली असून, यानंतर ज्वारीची पेरणी ही अवघी ५८० हेक्टरवर घेण्यात आली आहे. मात्र, आता पीकांना पाणीच नसल्याने पिके वाया जाण्याची भीती असून, ती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. (Nashik News)

अशी आहे रब्बीची पेरणी

  • पीक – सरासरी क्षेत्र – पेरणी
  • ज्वारी – ४३९ – ५८० हेक्टर
  • गहू – ६३५१ – ३१४९ हेक्टर
  • मका – २७८ – २७८८ हेक्टर
  • हरभरा – ४२५३ – ४१३६ हेक्टर