Agro News | केंद्र सरकार आता ‘अशा’प्रकारे करणार मालाची खरेदी; बघा काय आहे योजना ?


Agro News |  केंद्र सरकारने दर स्थिरीकरण ह्या योजनेमार्फत (पीए, करावयाची कांद्याची खरेदी यापुढे विति कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून देखील खरेदी करण्याचे ठरवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनेचा आता खऱ्या अर्थाने लाभ मिळणार आहे. आतापर्यंत ही खरेदी केवळ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशन मार्फतच केली जात होती. 

मात्र, आता शेतकऱ्यांचा विचार करत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ह्या नवीन धोरणाचे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी देखील स्वागत केले आहे. तसेच केंद्रीय सहकार मंत्री तथा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, ग्राहक कल्याण मंत्री पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ‘पॅक्स’ अर्थात विविध कार्यकारी सोसायटिंच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याच्या ह्या शेतकरी हिताच्या निर्णयामुळे सर्वच स्तरावरून ह्या केंद्र सरकारच्या ह्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. 

महाराष्ट्र राज्यात पी.एस ह्या योजनेमार्फत हरभरा, तूर, मूग हे धान्य हमीभावाने खरेदी केले जात असते. दरम्यान, केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केलेल्या निर्माण केलेल्या ह्या योजनेमुळे प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर शेतकऱ्यांना आपला शेतमाल हा विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याच्या उद्दिष्ठाची पूर्तीही यामुळे होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी म्हटले आहेत. 

दरम्यान, केंद्र सरकारने भारतातील सर्वच भागातील शेतमालाची सरकारतर्फे खरेदी विविध कार्यकारी संस्था आणि  शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून केली गेल्यास शेतमालाच्या खरेदीत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने यामुळे आर्थिक लाभ होईल, असा विश्वास भाजपा किसान मोर्चातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.

तसेच, यामुळे ‘पॅक्स’ला आपल्या उत्पन्नाच्या वाढीसाठी केले जात असलेल्या व्यवसायात हक्काचा व्यवसाय मिळेल. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील यामुळे भर पडून ‘आत्मनिर्भर कृषी’ हे केंद्राचे धोरण मजबूत होईल, असा विश्वास किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केलेला आहे.