Flowers | सध्या बाजारपेठेत फुलं तेजीत; फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा


Flowers | विविधरंगी, विविधढंगी फुलं आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नाही तर माणसालाही नेहमीच मोहात पाडतात. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करत असतात. हिंदु धर्मात फुलांना विशेष महत्त्व असून सणासुदिच्या काळात देशात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

दिवाळी-दसरा नुकताच झालेला असला तरीही मराठी महिन्यातील पवित्र महिना महणजेच मार्गशीर्ष महिना सुरू आहे. त्यामुळेच या महिन्यात फुलांना अधिक मागणी असल्याने फुलांची मागणी वाढलेली आहे. दरम्यान, बाजारपेठेत फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असली तरीही मात्र मागणीच्या तुलनेत फुलांचा पुरवठा होत नसल्याने बहुतांश सर्वच फुलांच्या बाजारभावात वाढ झाली आहे. (Flowers)

Flowers | मार्गशीर्ष महिन्यात फुलांना का असते अधिक मागणी?

हिंदू धर्मियांमध्ये तसेच विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत केले जात असून महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची प्रथा प्रचलित आहे. त्यानिमित्ताने करण्यात येत असलेल्या पूजेसाठी फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असून सध्या राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईमुळे फुलांच्या लागवडी कमी प्रमाणात झाल्या आहेत. याकारणाने फुलांंच्या मागणीच्या तुलनेत फुलांचा पुरवठा कमी असल्याने बाजारभाव तेजीत दिसून येत आहेत. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दसऱ्यात झेंडूला होता कवडीमोल भाव..

यावर्षी हवामान आणि वाढलेल्या उष्णतेमुळे फुलांवर परिणाम झालेला असला तरीहा दसऱ्यानिमित्त मात्र फूल बाजारामध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. त्यामुळे फुलांचे दर ऐन दसऱ्यात घसरले होते. तर घाऊक बाजारात एक किलो झेंडूची विक्री १० ते ४० रुपये आणि शहराच्या विविध भागांत किरकोळ बाजारात एक किलो झेंडूची ३० ते ७० रुपये किलो दराने विक्री केली गेली.