Nashik Onion | कांदा अजून किती रडवशील? जिल्ह्यातील कांदा दरांतील उतार थांबेना!


Nashik Onion | नाशिक जिल्ह्यात सध्या कांदा प्रश्न चांगलाच पेटलेला असताना कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी अशी मागणी शेतकरी तसेच व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. आधी दुष्काळ त्यानंतर आता निर्यातबंदी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला असताना कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ तसेच दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. १३)मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली तर मालेगाव तसेच चांदवडकडे जाणारे मार्ग बंद झाल्याने काहीकाळ वाहतूकही ठप्प झाली. अखेर अर्ध्या तासानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Nashik Drought | उ. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती काय? आजपासून केंद्रीय पथक करणार पाहणी

कांदा प्रश्नी नाशिक जिल्ल्ह्यात अनेक दिवसांपासून आदोलनांची मालिका सुरू असून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकरी तसेच व्यापारी वर्गाकडून आंदालनं करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकरलेला हाोता त्यात नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारसमितींमध्ये लिलाव सुरु झालेले आहेत. दरम्यान, मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मालेगाव चौफुली वर धाव घेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Nashik Onion

कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांदा निर्यातबंदी मागे घ्या, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. त्यामुळे चांदवड तसेच मालेगावकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर आंदोलकांचा रास्ता रोको मागे घेण्यात आले. या रास्ता रोकोनंतर मनमाड बाजार समितीत येऊन शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या दिला असताना माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, किशोर लहाने, कैलास भाबड हे यावेळी उपस्थित होते. या ठिय्या आंदोलनानंतर एक वाजता कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले असताना यावेळी कमाल २२०० आणि सरासरी दोन हजारांचा कांद्याला दर मिळाला.